नांदेड (प्रतिनिधी)- मरळक फाट्याजवळ दोन जणांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह एका ऑटो चालकाला मारहाण करून लूट केली आहे.
कैलास बालाजी चंदापूरे हे ऑटोचालक आहेत. दि. 10 मे रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास ते नांदेड-पूर्णा रस्त्याने जात असताना धीरज प्रकाश सोनकांबळे (19) रा. अरूणोदयनगर, नांदेड, रवी देविदास धुतमल (19) रा. इंदिरानगर आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक मिळून ऑटाचोलक कैलास चंदापूरे यांना मारहाण करून धाक दाखवून त्यांच्याकडील 10 हजार रूपये किमतीचा मोबाईल काढून घेतला. भाग्यनगरपोलिसांनी ही घटना गुन्हा क्र. 260/2025 प्रमाणे दाखल केली आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाडेवाले करीत आहेत.
विधीसंघर्षग्रस्त बालकांसह तिघांनी ऑटोचालकाला लुटले
