नांदेड :- संत रामपालजी महाराज लिखित ‘ज्ञानगंगा’ आणि ‘जगण्याचा मार्ग’ या अमूल्य ग्रंथांचा लोकांपर्यंत प्रसार नांदेड़, महाराष्ट्र दि. 11 में 2025 रोजी नांदेड़ जिल्ह्यात संत रामपालजी महाराज लिखित ‘ज्ञानगंगा’ आणि ‘जगण्याचा मार्ग’ या शास्त्राधारित पवित्र ग्रंथांचे भव्य प्रमाणात वितरण करण्यात आले. या ग्रंथांचे वितरण हा केवळ पुस्तकवाटपाचा कार्यक्रम नव्हता, तर समाजपरिवर्तनाचा एक महान उपक्रम ठरला. या पवित्र ग्रंथांमधून संत रामपालजी महाराजांनी अत्यंत सुलभ व साध्या भाषेत समजावून सांगितले आहे कीः मानवी जीवनाचा खरा उद्देश काय आहे, नशा, व्यसन, विकार यांपासून दूर रहात खरे आध्यात्मिक जीवन कसे जगावे, आणि सर्व धर्मातील एकसंध सत्याची ओळख कशी करून घ्यावी. शास्त्राधारित आध्यात्माचा संदेश या दोन्ही ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व प्रमुख धर्मग्रंथांवर आधारित आहेत वेद, गीता, कुराण, बायबल व गुरुग्रंथसाहिब यांच्या प्रमाणित शास्त्रयुक्त आधाराने यामध्ये मार्गदर्शन दिले आहे. त्यामुळे कुठलाही मतभेद न करता, सर्व धर्मीयांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य या ग्रंथांमध्ये आहे. तरुणाईसाठी एक नवा आशेचा किरण आजच्या काळात तरुण पिढी नशा, व्यसन, वाईट संगत, आणि अनैतिकतेच्या विळख्यात अडकताना दिसते. अशा परिस्थितीत, ‘ज्ञानगंगा’ आणि ‘जगण्याचा मार्ग’ हे ग्रंथ त्यांच्या जीवनाला योग्य दिशा
देऊ शकतात. या ग्रंथांचा अभ्यास केल्यानेः जीवनात संयम, सदाचार आणि शुद्ध विचार येतात, कुटुंब, समाज आणि राष्ट्र मजबूत बनते, सर्वांगीण आध्यात्मिक उन्नती साधता येते. समाज परिवर्तनासाठी एक प्रेरणादायी पाऊल संत रामपालजी महाराजांचे हे कार्य केवळ आध्यात्मिक नव्हे, तर सामाजिक जागृतीचेही आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे माणूस भ्रमित झाला आहे, तिथे सत्याचा मार्ग दाखवणे ही काळाची गरज आहे. या ग्रंथांचे वाचन आणि आचरण केल्याने माणसाचे जीवन नशामुक्त, विकारमुक्त आणि व्यभिचारमुक्त होऊन, तो खऱ्या अथनि सुखी व समाधानी बनू शकतो. आज प्रत्येक व्यक्तीने या पवित्र ग्रंथांचा अभ्यास करून आपले जीवन उज्वल करावे, ही काळाची गरज आहे. कारण शुद्ध विचारांची सुरुवात म्हणजेच एक नवे युग निर्माण होण्याची नांदी आहे. “सत्याचे वाचन करा, शुद्ध जीवन जगा आणि खऱ्या सुखाचा अनुभव घ्या!”