नांदेड(प्रतिनिधी)-मौजे पार्डी ता.हिमायतनगर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बोधडी ता.किनवट येथील एक वेअर हाऊस फोडून चोरट्यांनी 4 लाख रुपयांचे सोयाबीन कट्टे चोरून नेले आहेत. मनाठा पाटी ता.हदगाव येथे एक बार फोडून चोरट्यांनी 58 हजार 400 रुपयांची विदेशी दारु चोरून नेली आहे. तसेच निवघा (बा) ता.हदगाव येथील वीज वितरण कार्यालयातील 3 लाख रुपये किंमतीचे ऍल्युमिनिएम वायर चोरट्यांनी लंपास केले आहेत.
मौजे पार्डी (ज) ता.हिमायतनगर येथील सुनिल तुकाराम घागरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 मेच्या रात्री 9 वाजेपासून ते 9 मेच्या मध्यरात्रीनंतर 1.45 वाजेदरम्यान त्यांच्या घराच्या दारावर लावलेला कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे दागिणे किंमत 1 लाख 28 हजार रुपयांचे आणि रोख रक्कम 4 हजार रुपये असा 1 लाख 32 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. हिमायतनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 96/2025 नुसार दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.
बोधडी ता.किनवट येथील प्रशांत गंगाधर सिरमवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.7 मे 2025 रोजी त्यांच्या मालकीचे राजेश्वर वेअर हाऊस फोडून चोरट्यांनी 130 ते 140 सोयाबिनचे कट्टे किंमत 3 लाख 50 हजार ते 4 लाख असा ऐवज चोरून नेला आहे. किनवट पोलीसंानी ही घटना गुन्हा क्रमांक 139/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस अंमलदार वाघमारे अधिक तपास करीत आहेत.
मनाठा येथील शिवाजी नागोराव कनके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मनाठा पाटीजवळ त्यांचे एक बिअर बार आहे. दि.7 मे रोजी रात्री कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या बारच्या पाठीमागील शटर तोडून आत प्रवेश केला आणि त्यातील विदेशी दारु आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा 58 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मनाठा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 84/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार यादव अधिक तपास करीत आहेत.
वीज वितरण कंपनीत सहगुत्तेदार असलेल्या गजानन शंकरराव जामगडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 मेच्या सायंकाळी 5 वाजेपासून 9 मे रोजीच्या सकाळी 10 वाजेदरम्यान मौजे निवघा बाजार येथील विज वितरण कंपनीच्या 33 केव्ही कार्यालयात ठेवलेले 960 किलो ऍल्युमिनियएम वायर किंमत 3 लाख रुपये हे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरले आहे. मनाठा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 142/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक नंद अधिक तपास करीत आहेत.
8 लाख 90 हजार रुपयांच्या चार चोऱ्या
