नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकार संघाचे अध्यक्ष कसे नियुक्त झाले यापेक्षा ते नियुक्त झाले हे खरे आहे. परंतू त्यांच्या निवडीनंतर चौथा महिना सुरू झाला आहे. तरी पण अद्याप जिल्ह्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली नाही. अध्यक्षांच्या अधिकारातील या नियुक्त्या असतांना सुध्दा का होत नसतील? हे लिहायचे ठरवले तर त्यासाठी 10 ते 20 भाग लिहावे लागतील. तरी आम्ही थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषद यांच्या सलग्नतेत चालतो. संपूर्ण नियंत्रण मराठी पत्रकार परिषदेकडे असते. मराठी पत्रकार परिषदेवर अत्यंत संघर्षानंतर सध्या अध्यक्ष पदावर एस.एम.देशमुख विराजमान आहेत. त्यांच्याकडे खरा न्याय आहे असे बोलले जाते. कारण आपल्या जीवनात सुध्दा त्यांना भरपूर संघर्ष करावा लागला. म्हणून सगळ्या पत्रकार संघटनांच्या आशा त्यांच्यावर अवलंबून आहेत.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघावर एस.एम.देशमुख यांच्या आदेशानेच संतोष पांडागळे यांची नियुक्ती झाली. या नियुक्ती मागील राजकारण लिहिता येईल. पण वाचकांना ते कळते म्हणून आम्ही ते लिहित नाही. त्यांच्या नियुक्तीच्या वेळी त्यांना विरोध करणारी बरीच मंडळी होती. संतोष पांडागळेंच्या स्पर्धेत गोवर्धन बियाणी यांचे नाव सुध्दा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदासाठी जोरदारपणे चर्चेत होते. गोवर्धन बियाणी यांच्या बद्दल सबका साथ सबका विकास अशी त्यांची विचारश्रेणी आहे. असे सर्वच पत्रकार मानतात आणि पत्रकारांचा खरा नेता अशी त्यांची ख्याती आहे. आजही अध्यक्ष संतोश पांडागळे यांच्या पेक्षा जास्त पत्रकारांचा संपर्क गोवर्धन बियाणी यांच्यासोबत आहे. तरी पण अध्यक्ष पदावर संतोष पांडागळे यांचा क्रमांक लागला हा त्यांनी खेळलेल्या खलबतांचा परिणाम असेल ठिक.
1 जानेवारी 2025 रोजी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघावर संतोष पांडागळे यांची नियुक्ती झाली. 2 जानेवारी 2025 रोजी माझी मुख्यमंत्री खा.अशोकरावजी चव्हाण यांनी संतोष पांडागळे यांचे अभिनंदन करणारी पोस्ट फेसबुकवर सोडली. अध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार अध्यक्षांकडे असतात. परंतू संतोष पांडागळे यांना आपल्या अत्यंत व्यवस्थ कारभारातून वेळ मिळत नसेल म्हणून बहुदा इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या असतील. आमचा असा आरोप नक्कीच नाही की ते जाणून बुजून उशीर करत असतील. पण उशीर का होत आहे हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहेच.
पत्रकार संघांच्या पदाधिकारी नियुक्त्या कधी करता अध्यक्ष संतोषजी पांडागळे साहेब
