नांदेड :-” सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.प्रकाश आबिटकर साहेब यांना भेटून नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग संघर्ष समितीचे पदाधिकारी तथा संघर्ष योद्धे दि. 08/04/2025 रोजी निवेदन दिले राज्य शासनाच्या आरोग्य सेवा अंतर्गत हिवताप, हत्तीरोग व जलजन्य आजार हा विभाग स्वतंत्रपणे कार्यरत असून राष्ट्रीय कार्यक्रमात मोडतो. जिल्हा पातळीवर जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी यांच्या मार्फत कार्यक्रमांची अंमलबजावणी होते. गेले कित्येक वर्षांपूर्वी राज्यात व जिल्ह्यात हिवताप हा आजार अक्षरशः धुमाकूळ घालत असे. मात्र उपरोक्त विभागांनी मागील अनेक वर्षांत अत्यंत सुनियोजितपणे अन सुरळीतपणे व हत्तीरोग नियंत्रणाचा कार्यक्रम राबवला जात आहे. त्याचा परिणाम म्हणूनच सध्या या आजारांचे प्रमाण देखील अगदी नगण्य आढळून येते आज देखील या विभागाचे अधिकारी, कर्मचारी डास नियंत्रण , ताप सर्वेक्षण, हिवताप व हत्तीरोग रक्त नमुने तपासणी व उपचार या सोबतच आरोग्य विभागातील इतरही राष्ट्रीय कामे पार पाडत असतात.
परंतु मा.सहसंचालक, आरोग्य सेवा (हिहवज) पुणे यांनी दि. 26 मार्च 2025 रोजी परिपत्रक काढून राज्य शासनाचा हा राष्ट्रीय विभाग जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा तुघलकी घात घातला आहे. या हस्तांतरणामुळे या हिवताप, हत्तीरोग विभागाच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे या हस्तांतरण परिपत्रकाविषयी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून या आस्थापनेवरील विविध संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांनी या परिपत्रकास कडाडून विरोध दर्शवला आहे.
याच परिपत्रकाच्या विरोधाचा भाग म्हणून नांदेड जिल्हा हिवताप, हत्तीरोग संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या संघर्ष समितीच्या वतीने आज रोजी दि. 8 एप्रिल रोजी मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री प्रकाश आबिटकर साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. यावेळी समितीच्या वतीने अन्यायकारक परिपत्रक रद्द करणे व कर्मचाऱ्यांच्या इतर न्याय हक्क मागण्यासाठी निवेदन देण्यात आले. तद्नंतर सार्वजनिक आरोग्य विभाग अव्वर सचिव सेवा ५ मा. अनिल कुमेरीया साहेब यांना भेटुन निवेदन देत सविस्तर चर्चा केली यावेळी नांदेड हिवताप, हत्तीरोग संघर्ष समितीचे अध्यक्ष पुष्पराज राठोड, सचिव सत्यजीत टिप्रेसवार, कोषाध्यक्ष सचिन दळवी, मुख्य सल्लागार गंगाधर गन्लेवार, जिल्हा प्रवक्ते राजकुमार इंगळे उपस्थित होते.