नांदेड (प्रतिनिधी)- चोरटी विक्री करण्यासाठी जमा केलेला 20 ब्रास वाळूचा साठा नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडला आहे. या वाळू साठ्याची किंमत 90 हजार रूपये आहे.
पोलीस अंमलदार रामकिशन पांडूरंग मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता गंगानगर वाजेगाव येथील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत त्यांना एक वाळूसाठा दिसला. त्याची चौकशी केली असता हा वाळूसाठा शेख इलियास उर्फ इलू रा. गंगानगर याने केलेला होता. या वाळू साठ्याची किंमत 90 हजार रूपये आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र. 335/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.