नांदेड(प्रतिनिधी)-अवैधरित्या वाळू वाहतुक करणाऱ्या तिन गाड्या पकडून सोनखेड पोलीसांनी त्यांच्याविरुध्द तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. तीन गाड्यांमधील 15 ब्रास रेती आणि गाड्यांची किंमत असा एकूण 95 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 6.10 वाजेदरम्यान सोनखेड पोलीस पथक सोनखेड ते हदगाव रस्त्याने जात असतांना लोकमान्य महाविद्यालय सोनखेडे समोर एका मागे एक अशा तीन हायवा गाड्या आल्या. त्यांचे क्रमांक एम.एच.12 एस.एफ. 3165, एम.एच.01 सी.आर.8774, एम.एच.38 एक्स 0077 असे आहेत. या प्रत्येक गाडीमध्ये 5 ब्रास रेती एकूण 75 हजार रुपयांची भरलेली होती आणि या गाड्यांची एकूण किंमत 95 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल सोनखेड पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 73, 74 आणि 75 दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये आरोपी या सदरात संजु मधुकर किरतवाड (25ं), वाहन चालक रा.पाताळगंगा ता.कंधार, रोहिदास संजय चव्हाण (35) वाहन चालक रा.दुर्गा तांडा ता.कंधार, भागवत गोविंदराव कऱ्हाळे (35) वाहन चालक रा.पारवा ता.पालम जि.परभणी असे आहे.
पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस अंमलदार गणपत गिते, लोभाजी वाघमारे, विश्र्वनाथ हंबर्डे, ज्ञानोबा कौठेकर, दिगंबर कवाळे, रमेश वाघमारे आणि देवकते यांनी ही कार्यवाही केली.
सोनखेड पोलीसांनी अवैध रेतीच्या तीन हायवा पकडल्या
