नांदेड(प्रतिनिधी)-धुळवड संपताच पोलीस दलातील एक बदल लक्ष वेधून घेतो. लोहा पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्या जागी पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्ती मागचे रहस्य मात्र आम्हालाही उलगडता आलेले नाही.
नांदेड जिल्ह्यात पोलीस ठाणे लोहा ही नियुक्ती तशी आव्हानात्मक आहे. या ठिकाणी असलेले पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातून तिकडे पाठविले होते. काल धुळवड संपताच सायंकाळी उशीरा नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर यांना पोलीस ठाणे लोहा येथे प्रभारी अधिकारी म्हणून पाठविले आहे. नागनाथ आयलाने यांना येथून काढून कोणत्या जागी नियुक्ती दिली याची माहिती मिळू शकली नाही.
पोलीस ठाणे लोहा येथे आता पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर
