नांदेड(प्रतिनिधी)-धुळवड संपताच पोलीस दलातील एक बदल लक्ष वेधून घेतो. लोहा पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्या जागी पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्ती मागचे रहस्य मात्र आम्हालाही उलगडता आलेले नाही. नांदेड जिल्ह्यात पोलीस ठाणे लोहा ही नियुक्ती तशी आव्हानात्मक आहे. या ठिकाणी असलेले पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातून तिकडे पाठविले होते. काल धुळवड संपताच सायंकाळी उशीरा नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर यांना पोलीस ठाणे लोहा येथे प्रभारी अधिकारी म्हणून पाठविले आहे. नागनाथ आयलाने यांना येथून काढून कोणत्या जागी नियुक्ती दिली याची माहिती मिळू शकली नाही. Kanthak Suryatal Post Views: 2,008 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्टारलिंकला भारताचे संपूर्ण इंटरनेट दिले गेले ; राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्याचे काय? गोरठा येथील अनोळखी मयताची ओळख पटली; मारेकरी असणारे आई व पुत्र पकडले