नांदेड – येथील “दैनिक नांदेड वृत्तवेध”चा नववा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धुळवडीच्या पूर्वसंध्येला नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते वर्धापन दिन विशेषांकाचे गुरुवार दि. १३ मार्च रोजी प्रकाशन करण्यात आले. यावेळी दैनिक नांदेड वृत्तवेधचे मुख्य संपादक अंकुश सोनसळे, पत्रकार अनुराग पोवळे, प्रल्हाद लोहेकर, गोविंद करवा, महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे, आयुक्तांचे स्वीय सहाय्यक महेश आसने, कर्मचारी कैलास घोगरे आदी उपस्थित होते.
गेल्या २८ फेब्रुवारी रोजी दैनिक नांदेड वृत्तवेधचा नववा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दि.14 मार्च रोजी विशेषांक प्रकाशित करण्यात आला. शुक्रवारी रंगपंचमी असल्यामुळे होळीच्या दिवशी अर्थात दिनांक 13 मार्च रोजी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
वृत्ताचा वेध घेऊन समाजहिताचा सतत ध्यास घेणारे दैनिक नांदेड वृत्तवेध गेल्या आठ वर्षांपासून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सामाजिक जाणीवा पेरत, सत्य आणि पारदर्शक भूमिका घेत, वृत्तवेधच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडली जात आहे. समाजातील विविध विषयांवर प्रकाश टाकत सामाजिक जागरूकता वाढवली आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांतील घटनांचे मोलाचे विश्लेषण करणारे वृत्तपत्र म्हणून दैनिक नांदेड वृत्तवेध ओळखले जात आहे. दरम्यान, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, पत्रकार प्रकाश कांबळे, विजय जोशी, धर्मपाल नरवाडे, शिवराज बिच्चेवार, प्रल्हाद कांबळे, सुरेश काशिदे, भारत दाढेल, प्रवीण खंदारे, सुनील पारडे, श्याम कांबळे, राहूल साळवे, माधव गोधने, अर्जुन राठोड, हैदर अली, बुद्धभूषण सोनसळे, संघरत्न पवार, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, साहित्यिक प्रकाश मोगले, डॉ. राम वाघमारे, आनंदा गोडबोले
यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसेच वाचक व हितचिंतकांनी मुख्य संपादक अंकुश सोनसळे व त्यांच्या टीमचे कौतुक केले आहे.