नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अत्यंत प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या ग्यानमाता विद्या विहार या शाळेतील सेवकाने एका 10 वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करण्याची दुर्देवी घटना घडली आहे. वृत्तलिहिपर्यंत विमानतळ पोलीस ठाण्यात या संदर्भाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अत्याचार करणाऱ्या सेवकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार शहरात ग्यानमाता विद्या विहार ही शाळा आहे. मागील अंदाजे 30 वर्षापासून तरी ही शाळा नंादेड मधील विद्यार्थ्यांना विद्याज्ञान देत आहे. शाळेचे व्यवस्थापन हे ख्रिश्चन संस्थेकडे आहे. तरी पण सर्वात जास्त शिस्त अशाच शाळांमध्ये असते. पण याच शाळेत 52 वर्षीय सेवक सुभाष मच्छल याने 10 वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला. बालक शाळेतून घरी गेल्यावर घडलेला प्रकार आपल्या आई-वडीलांना सांगितला आणि त्यांनी लगेच पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी या घटनेची त्वरीत दखल घेतली आणि बालकावर अत्याचार करणाऱ्या सुभाषला ताब्यात घेतले आहे. वृत्तलिहिपर्यंत या घटनेसंदर्भाचा गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया पोलीस ठाणे विमानतळ येथे सुरू होती. एका मुर्ख माणसाच्या अनैतिक चुकीमुळे शाळेची अबु्र वेशीवर टांगली गेली आहे.
ग्यानमाता शाळेत 10 वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार
