नांदेड(प्रतिनिधी)-द.नांदेड सिख गुरूद्वारा श्री हजुर अबचलनगर साहिब कायदा 1956 च्या कलम 6 व 11 मध्ये केलेले संशोधन रद्द करण्यासाठी काही सिख युवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून निवदेन दिले आहे.
आपल्या निवेदनात 17 एप्रिल 2015 चे असाधारण राजपत्र संदर्भ म्हणून जोडले आहे. नांदेड येथे दशम गुरु श्री गुरू गोविंदसिंघजी महाराज यांनी इ.स.1708 मध्ये देहरुपी गुरूप्रथा बंद करून मानवता व एकतेचा संदेश देणारे पवित्र धर्मग्रंथ श्री गुरु गं्रथसाहिबजी महाराज यांना गुरु-ता-गद्दी प्रधान केली. सिखांच्या चार धर्मपिठांपैकी एक तख्त म्हणून तसेच सिखांची दक्षीण काशी या नावाने प्रसिध्द असलेल्या गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब नांदेडचे व्यवस्थापन करण्यासाठी द.नांदेड सिख गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुर अबलचनगर साहिब कायदा 1956 बनविण्यात आला होता. त्या कायद्यानुसार सर्व व्यवस्थापन सुरू होते.
दि.17 एप्रिल 2015 रोजी सिख समाजाला विश्र्वासात न घेता बेकायदेशीर, अन्यायकारक आणि लोकशाहीला घात निर्णय घेवून 1956 च्या कायद्याच्या कलम 6 आणि 11 मध्ये संशोधन करून गुरुद्वारा बोर्ड अध्यक्ष निवडीचे अधिकार महाराष्ट्र शासनाकडे घेण्यात आले आहेत. हे संशोधन बेकायदेशीर असून ते रद्द करावे आणि स्थानिक सीख समाजाला न्याया द्यावा अशी मागणी या निवेदनात आहे. या निवेदनावर अवतारसिंघ पहरेदार, गुरमितसिंघ महाजन, मनप्रितसिंघ कुंजीवाले, भागिंदरसिंघ घडीसाज, महेंद्रसिंघ लांगरी आणि गुरप्रितसिंघ सोखी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गुरुद्वारा बोर्डावर अध्यक्ष निवडीचे अधिकार महाराष्ट्र शासनाकडे आहेत ती कायद्यातील दुरूस्ती रद्द व्हावी-मागणी
