नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात न्यायालयाच्या पाठीमागील रस्त्यावर एक महिला आणि एका पुरूषाला पकडून वजिराबाद पोलीसांनी 20.5 किलो गांजा पकडला आहे. या गांजाची किंमत 1 लाख 600 रुपये आहे. आज मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी पकडलेल्या दोघांना 23 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर बंकटराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस अंमलदार मोहन हाके, अर्जुन मंडे, श्रीराम दासरे, दारा राठोड, राजेश माने यांच्यासह 17 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास न्यायालयाच्या पाठीमागील रस्त्यावर त्यांनी मिर्झा नईम बेग मिर्झा करीब बेग (37) रा.किल्ला रोड आणि अख्तरी बेग शेख मियॉ (50) रा.हतई इतवारा हे दोघे आपल्या पाठीवर बॅग घेवून जात असतांना थांबवले आणि तपासणी केली असता त्यात गांजा हा अंमली पदार्थ होता. अंमलीपदार्थ प्रतिबंधक अधिनियम 1985 मधील कलम 20(ब) (2) प्रमाणे वजिराबाद पोलीस ठाण्यात पकडलेल्या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 70/2025 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वजिराबाद येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत लोंढे हे करीत आहेत. आज वजिराबाद पोलीसांनी पकडलेल्या अख्तरी बेगम आणि मिर्झा नईम बेग यांना न्यायालयात हजर करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोघांना पाच दिवस अर्थात 23 फेबु्रवारी 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
वजिराबाद पोलीसांनी 20 किलो गांजा पकडला ; महिला आणि पुरूषाला 23 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी
