रस्तावर बर्थडे साजरा करणे, दारु पिणे महागात पडले

नांदेड(प्रतिनिधी)-रोडवर बर्थडे साजरा करणे, दारु पिणे असे कृत्य करणाऱ्या 29 जणांविरुध्द सहाय्यक पोलीस निरक्षिक संकेत दिघे आणि त्यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे.
शहरात टवाळक्या करणे, शिकवणी वर्गांमध्ये त्रास देणे, रस्त्यावर बथर्ड साजरा करणे, दारु पिणे यावर वचक राहावा म्हणून पोलीस विभागाने विशेष पथकाची स्थापना केली.

त्यानुसार 2 फेबु्रवारी रोजी आनंद नगर येथे राज वाईन शॉप चालक यांनी वाईन शॉपसमोर अवैधपणे दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. म्हणून सिटी स्ट्रीट सेप्टी पथकाने 7 व्यक्ती व दुकान चालक अशा आठ लोकांवर कार्यवाही केली. पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्द आयटीआय येथे वाढदिवस रस्त्यावर साजरा करणाऱ्या सहा जणांविरुध्द कार्यवाही करण्यात आली. पोलीस ठाणे विमानतळ आणि भाग्यनगर या हद्दीत सार्वजनिक ठकाणी गोंधळ करणाऱ्या 15 जणांवर कार्यवाही करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दिपक जोशी, पोलीस अंमलदार ज्ञानेश्र्वर बोईनवाड, नवीद वाहीद, नवनाथ नागरगोजे, विजय सुर्यवंशी, सय्यद मगदुम, शिवराज आडबे, प्रविण शिंदे, ज्ञानेश्र्वर तेलंग यांनी ही कार्यवाही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!