दोन पोलीस निरीक्षक नांदेडला येणार आणि दोन जाणार, पाच सहायक पोलीस निरीक्षक जाणार आणि पाच येणार
नांदेड, दि.१ (प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील अर्थात नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यामधील पाच पोलीस निरीक्षक आणि ११ सहायक पोलीस निरीक्षकांना त्यांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. आज पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हे आदेश जारी केले आहेत.
लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागल्यानंतर विहीत कालमर्यादा पूर्ण केलेल्या अनेक पोलीस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या होत्या. परिक्षेत्राप्रमाणे त्या त्या पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांचे अधिकार परिक्षेत्रीय कार्यालयाला आहेत. त्यानुसार पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आज पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात नांदेड येथून दोन जात आहेत, आणि दोन येणार आहेत. बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षक पुढीलप्रमाणे. अनंत ज्ञानदेव भंडे-नांदेड (लातूर), समाधान किशन चवरे-नांदेड (लातूर), संतोष बापूराव तांबे-हिंगोली (नांदेड), जगदीश शिवाजी मंडलवार-परभणी (नांदेड), प्रेमप्रकाश मारोतराव माकोडे-परभणी (हिंगोली) असे आहेत.
बदल्या झालेल्या ११ सहायक पोलीस निरीक्षकांमध्ये पाच नांदेडला येत आहेत आणि पाच नांदेड जिल्ह्याबाहेर जात आहेत. नांदेड येथून जाणारे पाच पोलीस निरीक्षक पुढीलप्रमाणे आहेत. सुधाकर विठ्ठलराव खजे-परभणी,दिपक साहेबराव मस्के-हिंगोली, बाळासाहेब मनोहर नरवटे-लातूर, बाळासाहेब विष्णू डोंगरे-लातूर, सुनिल पांडूरंग गायकवाड-लातूर. नांदेड येथे येणारे पाच पोलीस निरीक्षक पुढीलप्रमाणे आहेत. रवी वैजनाथराव वाव्हुळे, श्रीमती अनुपमा दिलीपराव केंद्रे, शिवप्रसाद माधवराव कत्ते-लातूर, अनिल दत्ता काचमांडे, विशाल दिपक भोसले-हिंगोली. आणि परभणी येथील सहायक पोलीस निरीक्षक रसुल बशीरसाब तांबोळी यांना हिंगोली येथे पाठविण्यात आले आहे.