नांदेड-सब-ज्युनिअर राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत नागेश लुटे याने ६१ किलो गटातुन महाराष्ट्राचे नेतृत्व करत रौप्य पदक पटकावले आहे.
पुणे येथे दि.१८ ते २२ जानेवारी या कालावधीत पुणे येथे राष्ट्रीय सब ज्युनीअर ज्युदो स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत मुदखेड येथील राजर्षी शाहू विद्यालयाचा विद्यार्थी नागेश नारायण पाटील लुटे याने १४ वर्षाखालील ६१ किलो वजनी गटातील ज्यूदो कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनीधीत्व करत रौप्य पदक पटकावले.
नागेश लुटे याने मिळवलेल्या यशाबद्दल नांदेड जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव प्रवीणकुमार कुपटीकर, उपाध्यक्ष रविकुमार बकवाड, जिल्हा क्रिडाधिकारी जयकुमार टेंभरे, क्रिडाधिकारी संजय बेतिवार, बालाजी शिरसीकर, विठ्ठल पुयड, जगतसिंघ गाडीवाले, दिलीपसिंघ गाडीवाले, रविकिरण डोईफोडे, प्रल्हादराव पुयड, जगन्नाथ टरके, गोपिचंद लुटे पाटील, अमोल कंकाळ, बारी वस्तादसह पैलवान नागेश लुटेचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.