माळेगाव यात्रेत निक्षय वाहनाचे आमदार चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड –  नांदेड जिल्ह्यात 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 या कालावधीत शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत क्षयरोग विभागातर्फे निक्षय वाहन म्हणजे एक फिरस्ती रुपी वाहन तयार करण्यात आले आहे. या निक्षय फिरत्या वाहनाचे उद्घाटन नुकतेच माळेगाव यात्रेत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले .

या निक्षय वाहनाच्या माध्यमातून ट्रू नेट या उपकरणाद्वारे संशयित क्षय रुग्णांचे थुंकी नमुने तपासणे व रोग निदान करणे व यातून अति जोखीम रुग्णही शोधणे तसेच रुग्णांचे एक्स-रे काढून निदान करणे व निदान झालेल्या क्षय रुग्णांचे लगेच औषधोपचार चालू करणे असे नियोजन करण्यात आले आहे . सोबतच क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. या तपासण्या तज्ञ व्यक्तींच्या नियोजनातून होत आहेत.

वाहनाच्या उदघाटन प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ) मंजुषा जाधव कापसे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सौ.संगीता देशमुख ,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड , माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, क्षयरोग विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. खाजा मैनोद्दीन , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कांबळे, पीपीएम समन्वयक श्रीमती ज्योती डोईबळे , वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक दिगंबर मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते. या निक्षय वाहनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या सेवेचा गरजूंनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!