नांदेड(प्रतिनिधी)-54 लाखांची लाच मागणी करून 40 लाखांची लाच स्विकारणाऱ्या दोन जणांनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तिसरा आरोपी, प्रभारी मुख्याध्यापकास अटक केल्यानंतर तिसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी त्याला 4 जानेवारी 2025 पर्यंत पोलीस कोठडी पाठविले आहे.
दि.22 नाव्हेंबर रोजी बॅंकेतून पैसे काढल्यानंतर ते पैसे लाचेच्या स्वरुपात शिवराज विश्र्वनाथ बामणे (40) लिपीक छत्रपती शाहु महाराज निवासी अपंग विद्यालय काबरानगर नांदेड, चंपत आनंदराव वाडेकर (50) लिपीक कुंटूरकर निवासी दिव्यांग कार्यशाळा राजनगर नांदेड या दोघांना पकडले. त्यानंतर या प्रकरणातील तिसरा आरोपी यादव मसनाजी सुर्यवंशी (55) प्रभारी मुख्याध्यापक वैभव निवासी शाळा खानापूर ता.देगलूर यास 30 डिसेंबर रोजी पकडले. या अगोदर पकडलेल्या लोकांकडून लाचेचे 40 लाख रुपये जप्त केले होते आणि शिवराज बामणे यांच्या अंग झडतीतून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 98 हजार 540 रुपये जप्त केले होते. 54 लाखांची लाच मागणी दिव्यांग कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन काढण्यासाठी होते. ती रक्कम जवळपास दीड कोटी रुपये आहे.
काल पकडलेल्या यादव मसनाजी सुर्यवंशी या मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक गजानन बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज न्यायालयात हजर केले. मुख्याध्यापकाची घर झडती 13 नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यात 6 लाख 87 हजार रुपयांची मालमत्ता सापडली होती. या लाच प्रकरणातील विविध मुद्यांच्या संदर्भाने या मुख्याध्यापक असलेल्या यादव सुर्यवंशीला पोलीस कोठडी देणे आवश्यक असल्याचा मुद्दा जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी मांडला. युक्तीवाद ऐकून न्यायाधीशांनी मुख्याध्यापक यादव मसनाजी सुर्यवंशीला 4 जानेवारी 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.