नांदेड :- दि. 30 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही महर्षी मार्कंडेय दिनदर्शिका – 2025 प्रकाशन सोहळा महर्षी मार्कंडेय मंदिर, गंगाचाळ नांदेड येथे सायंकाळी 5:00 वा. मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. सदरील दिनदर्शिकेच्या 10 हजार प्रती नांदेड जिल्ह्यातील पद्मशाली समाज बांधवांना मोफत वितरित करण्यात येणार आहे.
या प्रकाशन सोहळ्यास अध्यक्षस्थानी मार्कंडेय पद्मशाली संघम ट्रस्ट सचिव श्री बुरला पैंटया, प्रमुख पाहुणे म्हणून अखील भारतीय पद्मशाली संघम हैद्राबादचे गौरव अध्यक्ष श्री श्रीधर सुंकुरवार, उपाध्यक्ष श्री प्रल्हादराव सुरकुटवार, अ.भा.पद्मशाली संघम चे महाराष्ट्र अध्यक्ष तथा लेबर फेडरेशन चे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत गोणे, पद्मशाली समाज भूषण तथा गोदावरी हातमाग सोसायटी नांदेडचे अध्यक्ष श्री तुलसीदासजी भूसेवार, शिवसेना नांदेड जिल्हा सहसंपर्कप्रमुख श्री प्रकाशभाऊ मारावार, म.न.पा. नांदेड चे माजी नगसेवक श्री नागनाथ गड्डम, युनायटेड पद्मशाली संघमचे मराठवाडा प्रौढ अध्यक्ष श्री जगन्नाथ बिंगेवार, गोदावरी हातमाग सोसायटीचे संचालक तथा युनायटेड पद्मशाली संघम मराठवाडा युवक अध्यक्ष श्री किशोर राखेवार, युनायटेड पद्मशाली संघमचे नांदेड जिल्हा युवक अध्यक्ष श्री नंदकिशोर अडकटलवार, प्रौढ अध्यक्ष उमेश कोकुलवार, श्री गोविंद गणपतराव कोकुलवार युनायटेड पद्मशाली मराठवाडा व्यापारी आघाडी अध्यक्ष, डॉ. सौ. प्रगती बालाजी निलपत्रेवार, महिला जिल्हाध्यक्षा युनायटेड पद्मशाली संघम नांदेड, पीपल्स कॉलेजचे माजी उपप्राचार्य बालाजी कोंपलवार, पद्मशाली समाज युवक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री संग्राम निलपत्रेवार, मा.युवक अध्यक्ष श्री धनंजय गुम्मलवार, मार्कंडेय मंदिर पद्मशाली संघम गंगाचाळ नांदेड चे अध्यक्ष श्री रविंद्र कोमटी, पद्मशाली समाज संघटनेचे नांदेड (उत्तर) तालुकाध्यक्ष श्री मल्लेश बल्ला, अ.भा.संघम नायगाव मा. तालुका अध्यक्ष श्री राजेश ताटेवार, नवनियुक्त तालुका अध्यक्ष डॉ.लक्ष्मण चन्नावार, महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री नागभूषण दुर्गम, राज्यसचिव श्री संतोष गुंडेटवार, कार्याध्यक्ष श्री शिवाजी अन्नमवार, उपाध्यक्ष श्री विजय वड्डेपल्ली, राज्य कार्यकरिणी सदस्य श्री नरसिमलू वंगावार, नांदेड जिल्हाध्यक्ष श्री विजय चरपिलवार, परभणी जिल्हाध्यक्ष विजय रामदिनवार, सौ. पिचकेवार, डॉ. अक्षय गुन्नाल, सत्यजीत टिप्रेसवार, अण्णा अनलदास, डॉ. बालाजी निलपत्रेवार, श्याम चिलकेवार, व्यंकटेश पुलकंठवार, संतोष गुम्मलवार, सुग्रीव आल्लेवार, धोंडीबा तालेवार, किशोर गोनेवार, अमोल मंगलेपवार, ऋषिकेश अडबलवार, महेश गाजुला, ओम गाजुला, माधुरी मनोहर, बोगा नरसिंग, गणेश पोला, योगेश दुर्गम, तसेच बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.
सदरील प्रकाशन सोहळ्यात संघटनेचे राज्याध्यक्ष नागभुषण दुर्गम यांनी प्रास्ताविकात संघटनेचे मागील 11 वर्षात संघटनेतर्फे राबविण्यात अलेलेल्या कार्याचा उल्लेख त्यांनी केला व सर्वांचा तळमळीचा विषय पद्मशाली समाजातील विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाचा प्रस्ताव मांडला. सर्व मान्यवरांनी सदरील विषय गांभीर्याने घेऊन यावर चर्चा केली यात मा.नंदुसेठ अडकटलवार (मंजुवाले) यांनी सर्व मान्यवरांच्या वतीने हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चरपिलवार व व्यंकटेश पुलकंठवार (VP) यांनी केले व आभार विजय चरपिलवार यांनी मांडले.