एकीकडे भारताचे गृहमंत्री अमित शाह विश्वरत्न डॉ. बी.आर. अंाबेडकर यांचा अपमान होईल, असे शब्द बोलतात आणि आजपर्यंत त्यांनी माफी मागली नाही. पण एक गायिका राष्ट्रपित्याचे भजन म्हणते तेव्हा सभागृहात गोंधळ होतो आणि सभागृहातच त्या गायिकेला माफी मागायला लावली जाते, कोठे चालला आहे आपला देश याचा विचार करण्याची गरज आहे.
बापू सभागृह पाटणा बिहार येथे काल दि. 26 डिसेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा झाला. या सोहळ्यात बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा, माजी केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद, अश्विनी चौबे, शाह नवाज हुसेन असे असंख्य आणि दिग्गज भारताचे जनता पार्टीचे नेते उपस्थित होते. भोजपूरी भाषेत अत्यंत समृद्ध आणि दमदार आवाज असलेल्या महिला गायिका देवी यांना त्या कार्यक्रमात सन्मानीत करण्यात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा निघून गेले. तेव्हा सुत्रसंचालकाने देवी यांना एक भजन गाण्यास विनंती केली. त्यानुसार त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आवडीचे भजन रघु पती राघव राजाराम.. हे भजन गाण्यास सुरूवात केली. या भजनामध्ये ईश्वरअल्लाह तेरो नाम असे शब्द आहेत, हे शब्द देवी या गायिकेचे नाहीत. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे ते शब्द आहेत. ईश्वरअल्लाह ऐकताच सभागृहातील काही भाजप कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ केला. या गोंधळात माजी केंद्रीयमंत्री अश्विनी चौबे हे देवी यांच्याजवळ आले आणि देवींना सांगितले माफी मागून घ्या. देवी यांनी मी सुुंदर भजन म्हणत आहे, त्यात मी प्रभू श्री रामचंद्रांची आठवण करत आहे, तरी पण आपल्याला यामुळे वाईट वाटले असेल तर मी त्यासाठी क्षमा मागत आहे, असे सांगून त्यांनी माफी मागितली आणि त्यांनी सभागृह सोडले. या सर्व प्रकारामध्ये आपली प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते शाह नवाज हुसेन यांनी सांगितले की, आता हद्द झाली आहे.
शाह नवाज हुसेन यांनी हद्द झाली आहे, असे म्हटले तर हा सुद्धा संपतो काय? हा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान आहे, की भोजपुरी गायिका देवी यांचा अपमान आहे. की बिहार राज्याचा अपमान आहे, ज्या राज्यामध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद आणि जयप्रकाश नारायण यांचा जन्म झाला होता की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा अपमान आहे. यावर विचार होण्याची गरज आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आवडत्या भजनात असलेले ईश्वरअल्लाह हे नाव घेताना त्यावर आक्षेप आणणे म्हणजे भारत देश अत्यंत वाईट परिस्थितीकडे चालला आहे. नितीश कुमार यांनी देशाची माफी मागावी असे म्हटले जात आहे. परंतु सरकार चालविताना त्यांना असलेल्या अडचणीतून ते बाहेर निघू शकतील काय तरच असे म्हणू शकतील. केंद्र सरकारने भारतीय चलनी नोटांवर गांधींचा चष्मा आणि फोटो वापरला आहे आणि त्याच राष्ट्रपिताच्या भजनाला गाताना एका महिला गायिकेला माफी मागायला लावली जाते, कारण त्यात अल्लाह हा शब्द आहे. देवीने ईश्वरअल्लाहाला वेगवेगळ्या प्रकारे म्हणून त्या भजनात रंगत आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याची उलटेच झाले. अल्लाह या शब्दावर असा उन्माद होत असेल तर भाजपला मुस्लिम मुक्त भारत करायचा आहे काय अशी विचारधारा सुरू झाली आहे. कोठे चालला आहे, आपला देश याचा विचार करावाच लागेल.
यासोबतच केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी संत मिराबाई यांच्या जीवनावर बोलताना लिहिलेला इतिहास बरोबर नसतो असे सांगून नव्याच वादाला सुरूवात केली आहे. यावरून उच्च स्तरावरील नेतेमंडळी काही तरी वेगळ्याच कारणांनी देशात वेगळेच प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
सोर्स-दीपक शर्मा, उमाकांत लखेडा, डॉ. आनंदकुमार, प्रा. रवीकांत, प्रितीप्रभा,देवी.