नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी बेकायदेशीर वाळू वाहतुक करणारी एक हायवा गाडी पकडली असून 30 लाखांची हायवा गाडी आणि 25 हजारांची वाळू जप्त करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार जमीर अहेमद शफीर अहेमद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.1 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजेदरम्यान भगवान बाबा चौकातून गस्त करत असतांना एम.एच.26 सी.एच.2721 ही हायवा गाडी तपासली. त्यामध्ये 5 ब्रास वाळू भरलेली होती. ही गाडी विष्णुपूरीकडून नांदेडकडे येत होती. या गाडीमध्ये कोणतेही कागदपत्र नव्हते आणि वाहतुकीची वेळ कायद्याच्या विरुध्द होती. नांदेड ग्रामीण पोलीसांनी याप्रकरणी गाडी चालक प्रेमचंद संभाजी भोकरे (39) रा.असर्जन नांदेड विरुध्द गुन्हा क्रमांक 842/2025 दाखल केला आहे. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे, पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार जमीर, कांबळे, आसिफ आणि डफडे यांनी केली. Kanthak Suryatal Post Views: 1,306 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation टेन्ट हाऊस फोडून चोरी सोनखेड पोलीसांनी चोरी करणारा आरोपी पकडला