नवी दिल्ली-भारतीय जनता पार्टीने किंबहुना केंद्र सरकारने दिल्ली येथे असलेल्या सेना मुख्यालयातून 1971 चा विजय दिवसाचा फोटा का काढून टाकला असा प्रश्न खा.प्रियंका गांधी यांनी काल लोकसभेत विचारला. याचे काहीच उत्तर शासनाने दिलेले नाही. यावरुन शासनाच्या मनात काय चालले आहे. ही बाब लक्षात येते.
1971 मध्ये बांग्लादेशमधील शेख मुजिबुर रहेमान यांनी स्वातंत्र्यांचा लढा उभारला होता. त्यावेळेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय थलसेना, जलसेना आणि वायुसेना या तिन्ही गटांना पाठवून त्यावेळेसच्या युध्दा सहभागी होत बांग्लालोकांवर होणारा अन्याय थांबवला आणि बांग्लादेशची उत्पत्ती झाली. आजच्या परिस्थितीत बांग्लादेशच्या माजी अध्यक्ष आणि शेख मुजिबुर रहेमान यांच्या कन्या शेख हसीना वाजेद तेथून पळून आल्या आहेत आणि सध्या भारताच्या सुरक्षेत आहेत. बांग्लादेशी जनता आपली नातलग नसतांना सुध्दा इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मदतीची भावना ठेवली. एवढेच नव्हे तर त्यांना पाकिस्तान पासून वेगळे करून स्वतंत्र देश तयार करून दिला.
आजच्या परिस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेशमध्ये वीज पुरवठ्याचा ठेका आणि इतर कामे भारतातील उद्योजक गौतम अडानी यांना मिळवून दिले. पण काही दिवसांपुर्वी बांग्लादेशात उद्रेक झाला. त्यात महत्वाचा मुद्या 1971 मधील स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या वारसा मिळणारा 35 टक्के आरक्षण हा मुद्या होता. तसेच अडानीला देण्यात आलेले महागाचे कंत्राट सुध्दा मुद्या होता. या मुद्यांवर देशभर झालेल्या उठावानंतर शेख हसीना वाजेद भारतात पळून आल्या आणि आजही त्या भारतात आहेत असे लोक सांगतात. बांग्लादेशाने शेख हसीना वाजेद यांच्याविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. बांग्लादेश आणि भारतात हस्तांरणाच्या संधीनुसार त्यांच्या गुन्ह्यातील आरोपी आमच्या देशात असेल किंवा आमच्या देशात दाखल झालेल्या गुन्ह्यामधील आरोपी बांग्लादेशमध्ये असेल तर तो त्या-त्या सरकारने पकडून परत करायचा आहे. पण भारत सरकारने हसीना वाजेद परत बांग्लादेशला पाठविलेली नाही. सध्या बांग्लादेशमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदुंवर अत्याचार होत आहे. भारताच्या पंतप्रधानांनी याबाबत बांग्लादेश सरकारला चर्चा करायला हवी पण तसे काही अद्याप घडलेले नाही. याही उपर पाकिस्तानने भारताकडून बांग्लादेशला पाठविल्या जाणाऱ्या अनेक वस्तु बंद करायला लावल्या आणि पाकिस्तान त्या वस्तु बांग्लादेशला देत आहे. सोबतच पाकिस्तानच्या एसएसजीने (स्पेशल फोर्स गु्रप) बांग्लादेशात प्रवेश केला आहे आणि बांग्लादेशी सरकारला, जनतेला विश्र्वासात घेवून ते भारतासोबतचा बदला काढणार नाहीत असे म्हणता येणार नाही. यावरही केंद्र सरकारने काहीच पावले उचललेली नाहीत.
सर्वात मोठे दुर्देव म्हणजे 1971 मध्ये जवळपास 90 हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकांपुढे गुडघे टेकल्यानंतर पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल ए.ए.के.नियाझी, भारताचे लेफ्टनंट जनरल अजितसिंघ अरोरा, ऑल इंडिया रेडीओचे सुरोजीत सेन, व्हाईस ऍडमिरल एन.कृष्णन, एअर मार्शल एस.सी.दिवाण, लेफ्टनंट जनरल सगतसिंघ, मेजर जनरल जे.एफ.आर.जेकप, फ्लाईट लेफ्टनंट कृष्णमुर्ती यांच्यासमक्ष संधी झाली. त्या संधीच्या वेळसचा फोटो भारतीय सैन्य दलाच्या मुख्यालयात लावलेला होता. काल 16 डिसेंबर 2024 रोजी सैन्य दलाने 1971 च्या विजयासाठी विजय दिवस साजरा केला आणि त्याच दिवशी दुर्देवी प्रकार उघडकीस आला की, 1971 च्या संधीचा तो फोटो सैन्य दलाच्या मुख्यालयातून काढून टाकण्यात आला आहे हा आरोप खा.प्रियंका गांधी यांनी लोकसभेत केला.
आज सैन्यात असलेले अधिकारी हा फोटो काढतील याची शक्यता धुसर आहे. मग कोणी काढला तो फोटो? इंदिरा गांधी यांच्या काळात घडलेल्या घटनेचा तो फोटो होता म्हणून काढला काय? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. यातून असे म्हणता येईल की, केंद्र शासनात असलेल्या कोणी तरी नेत्याच्या सांगण्यामुळेच तो फोटो काढला असेल. किती दुर्देवी प्रकार सुरू आहेत.