नांदेड (प्रतिनिधी)- सिगारेटचे पैसे मागितले म्हणून मुदखेड येथील गुजरी चौकात जवळपास 10 ते 12 जणांनी पानटपरी चालकाला मारहाण केली आहे.
मुदखेड येथील मोहम्मद वसीम अब्दुल मजीद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 नोव्हेेंबरच्या सायंकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान गुजरी चौकातील त्याच्या पानटपरीवर तात्या उर्फ धम्मदीप सुरेश चौदंते, पंडीत दिलीप झडते, सौरभ चौदंते, माधव सुनील हनमंते, विलास भगवान कांबळे आणि त्यांच्यासोबत इतर 8 ते 10 जणांनी सिगरेटचे पैसे देण्याच्या कारणावरून पानटपरीचालक मोहम्मद वसीम अब्दुल मजीदला तलवारीने मारहाण केली. काही जण त्यांना सोडवयाला गेले तेव्हा हल्ला करणाऱ्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुदखेड पोलिसांनी ही घटना गुन्हा क्र. 249/2024 प्रमाणे पोलीस दप्तरी दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.