नांदेड (प्रतिनिधी)- वामननगरमधील रेणुका माता मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी 1 हजार रूपये रोख रक्कम, एक गॅस सिलेंडर आणि दोन पितळेच्या समई असा 14 हजार रूपयांचा ऐवज चोरला आहे. दुसऱ्या एका घटनेत दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका पानटपरी चालकाला सुत गिरणी वाजेगावजवळ मारहाण करून त्याच्याकडील 1700 रूपये बळजबरीने हिसकावले आहेत.
वामनगर येथील रेणुका माता मंदिराचे कोषाध्यक्ष उमाकांत लक्ष्मणराव पांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 1 डिसेंबरच्या मध्यरात्री 3 ते 4 दरम्यान बंद असलेल्या मंदिराचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यातील 2 पितळी समई किंमत 10 हजार रूपये, एक गॅस सिलेंडर किंमत 3 हजार रूपये आणि दानपेटीमधील 1 हजार रूपरे रक्कम असा एकूण 14 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलिसांनी हा प्रकार गुन्हा 608/2024 नुसार दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक केजगीर हे करीत आहेत.
धनेगाव येथील सय्यद फारूच सय्यद मैनोद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 नोव्हेंबरच्या दुपारी शिवराजनगर उद्धवराव कवाळे रा. धनेगाव याने सय्यद फारूखला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु त्याने नकार दिला. परंतु शिवराज कवाळेने सय्यद फारूखला पानटपरीच्या खाली ओढून मारहाण केली आणि त्याच्या खिशातील 1700 रूपरे काढून घेतले. नांदेड ग्रामीण पोलिसांनी ही घटना गुन्हा क्र. 1118/2024 नुसार दाखल केली असून पोलीस उपनिरीक्षक टेंगसे अधिक तपास करीत आहेत.