नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार शिवदास देशमुखे यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
सन 2011 मध्ये पोलीस दलाची भरती प्रक्रिया पुर्ण करून सन 2012 मध्ये पोलीस दलात आलेले जलधारा ता.किनवट येथील शिवदास किशनराव देशमुखे (35) यांचे आज त्यांच्या घरी असतांना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. घरच्यांनी त्यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले असतांना डॉक्टारांनी सांगितले की, त्यांना दवाखान्यात आणण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. शिवदास किशनराव देशमुखे बकल नंबर 3229 हे सध्या पोलीस मुख्यालय नांदेड येथे कार्यरत होते. उद्या दि.29 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मुळगावी जलधारा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी आपल्या पोलीस अंमलदाराच्या अशा परिस्थितीत काय-काय मदत करायची असते ती सर्व केली आहे. शिवदास देशमुखे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. शिवदास देशमुखेच्या अकाली निधनाबद्दल पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.