नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात नदीकाठी चालविल्या जाणाऱ्या मदरसामध्ये एका 10 वर्षीय बालकासोबत दोन शिक्षकांनी लैगिंक अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्यात या बाबत दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड शहरात एका मदरसातील वस्तीगृहात राहणाऱ्या 10 वर्षीय बालकासोबत दोन तीन दिवसांपुर्वी लैगिंक अत्याचार घडला. या घटनेची वाच्यता झाल्यानंतर अनेकांनी जाऊ द्या ही भुमिका घेतली. पण अखेर याबाबत आलेल्या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(1), 115, 3(5) सह बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4 आणि 6 नुसार दोन शिक्षकांविरुध्द गुन्हा क्रमांक 575/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. वृत्तलिहिपर्यंत बालकावर लैगिंक अत्याचार करणारे शिक्षक सापडले नव्हते.
बालकावर लैगिंक अत्याचार करणारा शिक्षक महम्मद शाह नवाज अब्दुल रकीब (26) असे असल्याची माहिती सायंकाळी 7 वाजता प्राप्त झाली आहे. शाह नवाज हा बिहार राज्यातील राहणारा असून त्याला सुगावा लागताच तो नांदेडमधून गायब झाला आहे. त्याला शोधण्यासाठी वजिराबादचे पोलीस पथक रवाना सुध्दा झाले आहे. तो आता वृत्त लिहिपर्यंत सापडला की, नाही ही माहिती कळू शकली नाही. हा सर्व प्रकार मदरसा जामीया ईस्लामिया दारे अरकम हस्सापूर, वाघी वळण रस्त्याजवळ घडला आहे. या अत्याचार प्रकरणाचा तपास वजिराबादचे पोलीस निरिक्षक परेश्र्वर कदम हे करत आहेत.
One thought on “मदरसामध्ये 10 वर्षाच्या बालकावर दोन शिक्षकांकडून लैगिंक अत्याचार”