नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय विश्रामगृहात जाऊन 12 वर्षापुर्वी गोंधळ घालणाऱ्या दोघांना कंधार सत्र न्यायालयाने आज शिक्षा दिली आहे.
दि.10 मे 2012 रोजी शासकीय विश्रामगृह लोहा येथील शासकीय नोकरी व्यंकटी व्यवहारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या दिवशी रात्री 8 वाजता कंधार येथील आशिष अमृतराव गायकवाड आणि स्वप्नील पांडूरंग गवारे हे विश्रामगृहात आले आणि आम्हाला रुम द्या या कारणावरून वाद झाला. त्यांनी घातलेल्या गोंधळाची तक्रार दिल्यानंतर लोहा पोलीसांनी आशिष गायकवाड आणि स्वप्नील गवारे विरुध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने कंधार जिल्हा न्यायालयात चार साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह मानुन कंधार न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ पंचभाई यांनी आशिष गायकवाड आणि स्वप्नील गवारेला दोन महिन्यांची कैद आणि 3 हजार रुपये प्रत्येकी दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. महेश कागणे यांनी कामकेले.