नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये गाजलेला संगीत कार्यक्रम म्हणजे दिवाळी पहाट या कार्यक्रमाला काल माजी आमदार आणि आताचे उमेदवार मोहन हंबर्डे आणि लोकसभेतील उमेदवार रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपस्थितीत लोकसभा उमेदवार राजेंद्र चव्हाण यांनी माजी आ.मोहन हंबर्डे यांना तुम्ही गोदावरी नदीकडे किती लक्ष दिले असा प्रश्न विचारला असेल तर काय गोची झाली असणार माजी आ.मोहन हंबर्डे यांची आणि याचे उत्तर देतांना काय-काय शब्द वापरले असतील याची कल्पनाच न केलेली बरी.
यंदाची विधानसभा निवडणुक, लोकसभा नांदेड मतदार संघाची पोट निवडणुक आणि दिवाळी सण हा सर्व एकत्र आला आहे. त्यामुळे बऱ्याच कामांना खिळ बसली आहे, बरीच कामे करता येत नाहीत, काही बोलता येत नाही, काही दाखवता येत नाही अशा अनेक कारणांनी सध्याच्या परिस्थितीत अनेक गतीरोध आहेत. नांदेड शहरात मागील अनेक वर्षापासून गाजलेला संगित कार्यक्रम म्हणजे दिवाळी पहाट. काहीसा व्यक्तीगत आणि काहीसा प्रशासनिक असे या कार्यक्रमाचे स्वरुप असते. यात अनेक कलाकार आपल्या कौशल्याला प्रदर्शित करतात आणि जनतेकडून वाहवाह मिळवतात.
या कार्यक्रमात मागील पाच वर्षापासून नियमित येणारे नांदेड दक्षीणचे आमदार मोहन हंबर्डे हे यंदाही हजर होते. या कार्यक्रमात त्यांच्या शेजारी लोकसभा उमेदवार रविंद्र चव्हाण आणि माजी मंत्री डी.पी.सावंत यांना छायाचित्रात पाहिले असता एक प्रश्न उगीच खळबळ माजवत होता. प्रश्न असा आहे की, समजा लोकसभा उमेदवार रविंद्र चव्हाण यांनी मोहन हंबर्डे प्रश्न विचारला असेल की, तुम्ही मागील पाच वर्षामध्ये गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी, त्यातील दुर्देवी परिस्थितीसाठी काय-काम केले होते. रविंद्र चव्हाण हा प्रश्न का विचारतील असा प्रश्न वाचकांना येईल. त्याचे कारण असे आहे की, रविंद्र चव्हाण यांच्या कुटूंबात राजकीय व्यक्ती भरपूर आहेत. परंतू त्यांनी स्वत: राजकारणात आजपर्यंत काही केले नाही. आता त्यांना राजकारणात आणण्यात आले आहे. तेंव्हा राजकारणातील राजकारण समजून घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच त्यांनी हा प्रश्न नक्कीच विचारला असणार. काय गोची झाली असेल मोहन हंबर्डे यांची ?
कमीत कमी दिवाळी पहाट या कार्यक्रमाला नियमित हजेरी लावलेल्या मोहन हंबर्डे यांना उत्तर देतांना शब्द सुचले नसतील. कारण नदी पात्रातून होणारे बेकायदा वाळुचे उत्खनन, नदीमध्ये जोडण्यात आलेले खंडीभर नाले, नदीपात्रात असलेली घाण, त्या शेजारुन जाणारी मल्लनिस्सारणाची लाईन आणि ती लाईन फुटलेल्या अवस्थेत या समस्यांना रविंद्र चव्हाण यांना समजून सांगतांना मोहन हंबर्डेंना शब्द सुचले नसतील? जर पाच वर्ष ते दिवाळी पहाट कार्यक्रमाला आले आहेत. तेंव्हा कार्यक्रमाला येतांना किंवा कार्यक्रमातून परत जातांना त्यांनी सन 2007 मध्ये तयार करण्यात आलेला नदीघाट पुर्णपणे पाहिला काय? आणि तसे केले असते तर नदीकाठच्या भरपूर समस्या त्यांच्या लक्षात आल्या असत्या. पण आजच्या गोदावरी नदीची परिस्थिती पाहता त्यांनी काहीच केले नाही हे स्पष्ट दिसते आणि या प्रश्नाचे उत्तर रविंद्र चव्हाण यांना देतांना त्यांनी तरी समजून घ्यायला हवे की मला सुध्दा यावर काम करावे लागेल.