भाजपाच्या 99 विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर ; नांदेड जिल्ह्यात श्रीजया चव्हाण, राजेश पवार, डॉ.तुषार राठोड, भिमराव केराम यांना संधी

नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुक 2024 साठी आज भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुणसिंह यांच्या स्वाक्षरीने विधानसभेतील 99 उमेदवांची यादी जाहीर केली आहे. नांदेड जिल्ह्यात भोकर येथे श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव येथे राजेश संभाजी पवार, मुखेड येथे डॉ.तुषार गोविंदराव राठोड आणि किनवट येथे भिमराव केराम यांना उमेदवारी दिली आहे.
विधानसभा निवडणुक-2024 साठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रक्षामंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय निवड समिती सदस्यांसह झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या 99 उमेदवारांमध्ये प्रमुख उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.
नागपूर दक्षीण पश्चिम-देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे-कामठी (नागपूर), समितर दत्तात्रय मेघे-हिंगणा, मोहन गोपाळराव माते-नागपूर दक्षीण, कृष्ण पंचम खोपडे-नागपूर पुर्व, तानाजी मुटकुळे-हिंगोली, मेघना बोर्डीकर-जिंतूर, अतुल साळवे-औरंगाबाद पुर्व, प्रशांत बंब-गंगापुर, राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील-शिर्डी, संभाजी पाटील निलंगेकर-निलंगा, अभिमन्यु पवार-औसा, राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील-तुळजापूर, छत्रपती शिवेंद्र राजे भोसले-सातारा. नांदेड जिल्ह्यात श्रीजया अशोक चव्हाण-भोकर, राजेश संभाजी पवार-नायगाव, डॉ.तुषार गोविंदराव राठोड-मुखेड, भिमराव रामराव केराम-किनवट अशी ही यादी आहे.
वाचकांच्या सोयीसाठी भारतीय जनता पार्टीने जारी केलेली यादी बातमी सोबत जोडली आहे.

PRESS RELEASE–1st list of BJP candidate for Maharashtra Lgislative Assembly Election on 20.10.2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!