नांदेड(प्रतिनिधी)-गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. त्यासंदर्भाने शासनाचा कोणताही आदेश उपलब्ध नाही असे उत्तर सहाय्यक आयुक्त स्वच्छता यांनी दिल्यानंतर अर्जदार गौतम जैन यांनी जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस अधिक्षक यांना निवेदन देवून धार्मिक भावना दुखावणाऱ्या गुलाम मोहम्मद सादेक या स्वच्छता विभागातील सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.छोटे-छोटे कृत्रित तलाव तयार करून त्यात गणेश विसर्जन करून त्या गणेशमुर्तींवर माती टाकून तो खड्डा बंद करण्यात आला होता.
श्री गणेश विसर्जन झाले त्या दिवशी महानगरपालिकेने अनेक ठिकाणी छोटे- छोटे तलाव तयार करून त्यात गणेश विसर्जन करायला लावले. त्यानंतर त्या तलावात माती टाकून ते बंद करून टाकण्यात आले. या संदर्भाने गौतम जैन यांनी अगोदर माहितीच्या अधिकारात महानगरपालिकेकडे माहिती मागितली तेंव्हा गणेश विसर्जन करण्यासंदर्भाचे कोणतेही शासन आदेश उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला माहिती देताा येत नाही असे लिहुन गौतम जैन यांनी मागितलेल्या माहितीचा अर्ज निकाली काढण्यात आला होता. त्यानंतर गौतम जैन यांनी गुलाम मोहम्मद सादेक विरुध्द गुन्हा दाखल करण्याचा अर्ज दिला आहे. ज्या छोट्या तलावामध्ये गणपती विसर्जन केले गेले त्या तलावात नंतर माती टाकून गणपती मुर्तींना पुरून टाकण्यात आले असा गौतम जैन यांचा आरोप आहे. त्या ठिकाणी माती टाकून तलाव बंद करत असतांनाचे व्हिडीओ चित्रीकरण गौतम जैन यांच्याकडे उपलब्ध आहेत.
सोबत माती टाकून गणपती विसर्जन पुरत असतांनाचे व्हिडीओ..