नांदेड (प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करतांना 1 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी गाड्या धर्माबाद येथील दोन युवकांकडून जप्त केल्या आहेत.
नागभूषण विठ्ठलराव यनगुंदे यांची दुचाकी गाडी 8 ऑक्टोबर रोजी विष्णुनगरमधून त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली होती. या संदर्भाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 409/2024 दाखल होता. तसेच 9 ऑक्टोबर रोजी दत्तमंदिर, दयानंतर नगर नांदेड येथून भरत प्रविण कासलीवाल यांची दुचाकी गाडी चोरीला गेली होती. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक या दोन दुचाकी चोरीचा तपास करत असतांना त्यांनी धर्माबाद येथील साईनाथ मारोती म्याकलवाड(19) आणि बॉबी भगवानराव जाधव (20) या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून चोरी केलेल्या चार दुचाकी गाड्या मिळून आल्या. या गाड्यांची किंमत 1 लाख 34 हजार रुपये आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका यांनी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक किशोर गावंडे, पोलीस अंमलदार शेख अझरोद्दीन, राहुल लाठकर, लिंबाजी राठोड, देवसिंग सिंगल, सरबजितसिंघ पुसरी, मिथुन पवार, दत्ता वडजे आणि सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर यांचे कौतुक केले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने चोरीच्या चार दुचाकी पकडल्या
