नांदेड (प्रतिनिधी)-शाळेत चोरी झाल्यानंतर एका तासात नांदेड ग्रामीण पोलीसांनी चोरट्याला जेरबंद करून 8 हजार 500 रुपये किंमतीचे 23 रजिस्टर जप्त केले .
मुख्याध्यापिका निर्मला गंगाराम कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ज्ञानदिप प्राथमिक शाळा बळीरामपूर येथे 7 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 ते 8 ऑक्टोबरच्या पहाटे 6 वाजेदरम्यान शाळेतील 23 रजिस्टर ज्यामध्ये शाळेच्या विविध नोंदी केल्या होत्या ते चोरीला गेले आहेत. या संदर्भाचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीसांनी 8 ऑक्टोबर रोजी दुपारी दाखल केला.
पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार विक्रम वाकडे, आसिफ शेख, माधव माने, शंकर माळगे, ज्ञानेश्र्वर कलंदर, सुनिल गटलेवार, शिवानंद तेजबंद आदींनी आपल्या तपासाची चक्रे फिरवून एका तासात शाळेत चोरी करणारा सुशांत संभाजी जोंधळे (35) रा.बळीरामपूर नांदेड यास जेरबंद करून त्याने चोरलेले 23 रजिस्टर हस्तगत केले आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिकुमार नायक आदींनी नांदेड ग्रामीण पोलीसांचे कौतुक केले आहे.
शाळेत चोरी करणारा चोरटा नांदेड ग्रामीण पोलीसांनी 1 तासात पकडला
