उद्योगरत्न पुरस्काराचे नामाकरण आता रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार
नांदेड (प्रतिनिधी)-मी अगोदर निर्णय घेतो आणि नंतर माझा निर्णय बरोबर आहे हे सिध्द करून दाखवतो असा मोठा विचार भारताला नव्हे तर जगाला देणाऱ्या रतन नवल टाटा यांचे आज अश्विन शुध्द षष्टीच्या दिवशी रात्री अर्थात 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले.भारताचे पद्मविभूषण हा सन्मान रतन टाटा यांना मिळाला होता. भारतरत्न मात्र त्यांनी नाकारला होता. आज शासकीय इतमामात त्यांचा अंतिमसंस्कार करण्यात आला. त्यावेळी सर्व धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते. राज्य शासनाने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्काराचे नामाकरण आता रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असे केले आहे.
28 डिसेंबर 1937 रोजी नवल टाटा यांच्या घरात जन्मलेले रतन टाटा यांच्या आजोबांचे नाव रतन टाटाच होते. त्यांच्या पंजोबांचे नाव ज मशेदजी टाटा असे होते. जमशेदजी टाटा हे व्यक्तीमत्व भारतातच नव्हे तर जगात विख्यात झाले. रंगवाद असलेल्या ब्रिटनमध्ये त्यांना राहण्यासाठी जागा मिळाली नाही तेंव्हा त्यांनी ताज महाल हॉटेल बांधले. त्याच परिवारातून पुढे 1937 मध्ये रतन टाटा आले. आपले शिक्षण विदेशात पुर्ण करत असतांना वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना आपल्या आजीसोबत राहण्याची वेळ आली. कारण त्यांच्या वडीलांनी दुसरा विवाह केला होता. पण आपले सर्व शिक्षण पुर्ण करून प्रति जमशेदजी टाटा म्हणून रतन टाटा यांची ओळख हळूहळू तयार झाली आणि टाटा कंपनी एवढ्या उच्च स्तरावर गेली की, त्यांच्या सर्व कंपन्यांची नावे लिहायला बसलोत तर आठवणार नाहीत.
26/11 रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी ताजमहालवर हल्ला केला तेंव्हा अत्यंत थोड्यावेळातच ताज महालचे अतिरेक्यांनी केलेले काळे धुराचे लोट त्यांनी दुरूस्त करून घेतले. सन 2023 चा आपला जन्मदिन साजरा करतांना एका छोट्याशा कपात तेवढाच केक आणि एक मेणबत्ती लावून त्यांचा सहकारी युवक शंतनू नायडु याने हा जन्मदिन साजरा केला. त्याचे व्हिडीओ सुध्दा आता व्हायरल होत आहेत. त्यांच्या घरी त्यांनी पाळलेल्या कुत्र्यांचे फोटो आज दाखवले जात आहेत. ताज महाल हॉटेल ज्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी मोठ-मोठ्यांची गार होते. या हॉटेलमध्ये सुध्दा कुत्र्यांना जाण्यास मुभा आहे. कुणी त्यांना तेथून हाकलून लावत नाही. माणसांवर प्रेम सर्वच करतात. पण रतन टाटा यांनी कुत्र्यांवर दाखवलेले प्रेम किंबहुना जनावरांवर दाखवलेले प्रेम वाखाणण्यासारखे आहे. छोट्या जनावरांसाठी त्यांनी मुंबईमध्ये 165 कोटी रुपये खर्च करून दवाखाना बांधला आहे.
आपल्या संपत्तीतील बहुतांश हिस्सा दान करून त्यांनी एक दिशा दाखवली आहे की, आमच्याकडे येणाऱ्या संपत्तीचा उपयोग आम्ही कसा करू शकतो. रतन टाटा सांगतात मी अगोदर निर्णय घेतो तो चुक आहे की, बरोबर हे मला माहित नसते. परंतू मी घेतलेला निर्णय कसा बरोबर आहे हे मी सिध्द करून दाखवतो. एकदा रतन टाटांनी आपल्या जीवनात आनंदाचा उल्लेख करतांना असे सांगितले होते की, मी गडगंज श्रीमंत तर होतोच. त्यामुळे पैशांची कमरता नव्हतीच म्हणजेच पैशांच्या जोरावर कोणत्याही आनंद घेवू शकलो असतो. परंतू तो मला पैशांच्या जोरावरच आंनद नको होता. मी जिवनातला आनंद शोधत होतो. याचा शोध घेता-घेता एका दिवशी माझ्या मित्राने काही अपंग बालकांना तिन चालकी सायकल देण्यासाठी सांगितले. मी सायकली देण्यासाठी लगेच तयार झालो. परंतू मित्राने सांगितले की, तुला तेथे यायला हवे. तेंव्हा मी त्या कार्यक्रमात गेलो. आपल्या हाताने एक-एका बालकाला तिन चाकी सायकलवर बसून त्यांना निरोप दिला. तेंव्हा ती बालके माझ्याकडे ज्या नजरेने पाहत होती. त्या नजरांमध्ये मला खरा आनंद मिळाला. त्यातील एका बालकाने जमीनीवर बसून माझे पाय धरले. मी त्याला माझे पाय सोडण्यासाठी विनंती करत होतो. पण तो सोडत नव्हता आणि म्हणाला की, मला एकदा तुमचा चेहरा बघु द्या कारण मी जेंव्हा स्वर्गात जाईल आणि आपण येताल तेंव्हा मला तेथे सुध्दा आपले धन्यवाद व्यक्त करायचे आहे. तेंव्हा मिळालेला आनंद मी माझ्या जिवनात कधीच पाहिला नाही.
राज्य शासनाने रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंतिमसंस्कार शासकीय इतमामात केला, त्यांच्या मृत्यूनंतर एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आणि शासनातर्फे दिला जाणारा उद्योगरत्न पुरस्कार त्याचे नाव बदलून रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असे केले आहे. रतन टाटा यांना उद्योगरत्न हा पहिला पुरस्कार महाराष्ट्र शासनाने 28 ऑगस्ट 2023 रोजी देवून सन्मानित केले होते. त्यांच्या अंतिमक्रियेच्या वेळी भारतातील सर्व धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते. प्रत्येक धर्मगुरुने आप-आपल्या धर्माने सांगितलेल्या पध्दतीप्रमाणे त्यांच्यासाठी अंतिम प्रार्थना केल्या. आजच्या परिस्थितीत भारताच्या प्रत्येक नागरीकाला माझ्या घरचा माणुस मला सोडून गेला अशी भावना व्यक्त होत आहे. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांना आदरपुर्ण अभिवादन करत आहे.
भारत का अनमोल रतन अब नहीं रहा
