नांदेड(प्रतिनिधी)-आज अश्र्वीन शुध्द प्रतिपदेच्या दिवशी घटनस्थापना होत असते. या दिवसांमध्ये आई दुर्गा भवानी, आई तुळजाभवानी अशा अनेक आईंचा महोत्सव साजरा होतो. घरोघरी घटस्थापना होतात. नांदेड जिल्ह्यातील माहुर आणि रत्नेश्र्वरी येथे नवरात्र महोत्स मोठ्या प्रमाणात साजरा होतो. याच दिवसांमध्ये सचखंड श्री हजुर साहिब येथे सुध्दा दहा दिवस कार्यक्रम चालतात. या सर्व कार्यक्रमांची सांगता दसऱ्याच्या दिवशी होते. सार्वजनिक ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या दुर्गा मुर्तींचे विसर्जन दसऱ्या दुसऱ्या दिवशी होते. नांदेड जिल्ह्यात 2018 ठिकाणी सार्वजिक ठिकाणी दुर्गामुर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत.
आज सकाळपासूनच घरोघरी घाई होती. सर्वांनी आपल्या घरात घट मांडून आई दुर्गा देवीची आरधना सुरू केली. बाजारात सुध्दा सकाळी गर्दी होती. त्यानंतर दुपारी वेगवेगळ्या ठिकाणी दुर्गा देवींच्या मुर्ती घेवून सार्वजनिक मंडळांनी त्या आपल्या गल्लीत स्थापन केल्या.
नांदेडजवळच्या रत्नेश्र्वरी मंदिरात घटस्थापना झाली. असंख्य लोकांनी दर्शन घेतले. दररोज सकाळी अनेक महिला आपल्या घरातून पायी चालत शहरातील जुना मोंढा येथे असलेल्या कालीका मंदिरात जाऊन दर्शन घेतात. माहूर येथे घटस्थापना करण्यात आली. काही निवडक वाहने वगळता सर्व वाहनांची पार्किंग सोय गडाच्या खाली करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सुध्दा दहा दिवस चालणारा हा महोत्सव अत्यंत दिमाखात सुरू झाला. आई रेणुकेच्या चरणी डोके ठेवणाऱ्यांची गर्दी होती.
सचखंड श्री हजुर साहिब येथे सुध्दा या नवरात्रांच्या दहा दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन होते आणि त्यांची सांगता दसऱ्याच्या दिवशी हल्लामहल्ला या मिरवणुकीने होत असते. सर्वत्र नवरात्र उत्सवाचा आनंद सुरू आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका यांच्या नेतृत्वात पोलीस दल नवरात्र महोत्सवात काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी तयार आहे.