नांदेड-बिदरसह नांदेड लातूर मार्गाचा सर्व्हे लवकरच-अरुणकुमार जैन

नांदेड(प्रतिनिधी)-प्रत्येक वर्षी रेल्वे विभागाच्यावतीने प्रश्न मार्गी लावण्यासाठी व प्रवाशांच्या ज्या काही सुचना असतील त्या सोडविण्याासाठी खासदारांची बैठक बोलावली जाते. यातून अनेक विषयांवर चर्चा होवून प्रश्न मार्गी लागण्यासाठी वर्षातून एक बैठक ही विभागनिहाय घेतली जाते. नांदेड विभागाअंतर्गत मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात सकारात्मक कामे मार्गी लागली आहेत. येणाऱ्याही काळात या विभागाअंतर्गत अनेक कामे मार्गी लागणार असल्याचे दक्षीण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
नांदेड विभागाअंतर्गत खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला तीन राज्यसभेचे आणि पाच लोकसभेचे असे एकूण 8 खासदार उपस्थित होते. या बैठकीत सर्वांसोबत सकारात्मक चर्चा झाली. नांदेड विभागाअंतर्गत सर्व मार्गांवर रेल्वे लाईनचे काम पुर्णत्वास गेले आहे. अंकाई ते छत्रपती संभाजीनगर डबल लाईनचे काम सुरू आहे. तर छत्रपती संभाजीनगर ते परभणी आणि परभणी ते परळी या मार्गावरील डबल लाईनच्या सर्व्हेच्या कामाला मंजुरी मिळाली. अनेक ठिकाणी बायपास मार्ग काढण्यात आले आहेत. यामध्ये परभणी, अकोला, लातूर रोड, पुणे, परळी अशा अनेक ठिकाणी बायपासचे कामे हाती घेण्यात आले आहेत. याच बरोबर नांदेड-बिदर, बोधन-लातूर, नांदेड-लातूर या मार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. मागील पाच वर्षात नांदेड विभागाअंतर्गत 18 नवीन गाड्या चालविल्या जात आहेत. याचबरोबर अमृत भारत स्टेशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन रेल्वे स्थानकाचे काम प्रगती पथावर आहे. लवकरच नांदेड रेल्वे स्थानकाचेही काम आता या माध्यमातून सुरू केल जाणार आहे. एक आधुनिक रेल्वे स्थानक म्हणून या अमृतभारत रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून समोर येणार आहे. नवीन रेल्वे मार्गाच्या सर्व्हेसाठी 11 हजार 164 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. अशी अनेक कामे हाती घेण्यात आली. याचबरोबर नांदेड-प्रयागराज(वाराणसी), नांदेड-हैद्राबाद आणि नांदेड-मुंबई या मार्गावर नवीन गाड्या चालविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे अशी माहिती महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

नांदेड-देगलूर-बिदर रेल्वे कामाला गती द्या-खा.अशोक चव्हाण

नांदेडसाठी महत्वाचा असणारा नांदेड-देगलूर-बिदर या रेल्वे मार्गाच्या कामाला केंद्र शासनाने गती द्यावी. महाराष्ट्र शासनाने त्यांचा 50 टक्के वाटा देण्याची घोषणा केली. पण कर्नाटक सरकारने अद्यापही याची घोषणा केली नाही. यासाठी यात रेल्वे विभागाने हस्तक्षेप करून नांदेड-देगलूर-बिदर या मार्गाच्या कामाला गती द्यावी अशी मागणी खा.अशोक चव्हाण यांनी रेल्वे विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत केली.
नांदेड येथे दक्षीण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या खासदारांची बैठक नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. याा बैठकीला खा.अजित गोपछडे, खा.फौजीया खान, खा.डॉ.शिवाजी काळगे, खा.नागेश पाटील आष्टीकर, खा.संजय जाधव, खा.संजय देशमुख, खा.अनुप धोतरे, महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन, नांदेड विभागाच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांची उपस्थिती होती.
या बैठकीत खा.चव्हाण यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. यात प्रमुख्याने मुंबई-जालना वंदे भारत नांदेडपर्यंत विस्तारीत करण्यात यावी. याचबरोबर नांदेड-हैद्राबाद ही वंदे भारत सुरू करावी. आगामी काळात मुंबई-नांदेड-हैद्राबाद या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याच्या दिशेने रेल्वे विभागाने आतापासून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. यासाठी विशेषत: भुसंपादन करण्यासाठी मावेजा लागणार नाही. याचबरोबर मेडचेअल आणि चिखलठाणा या दोन रेल्वे स्थानकांचा विकास करावा. कारण हे दोन्ही स्थानक विमानतळांशी जवळ आहेत. याचबरोबर नांदेड-यवतमाळ, वर्धा या कामांनाही गती द्यावी. तत्कालीन रेल्वे मंत्री लालुप्रसाद यादव यांनी किनवट माहुर रेल्वे मार्गाची घोषणा केली होती. त्याही घोषणेची अद्यापही पुरतता झालेली नाही. याचीही आठवण या बैठकीत अधिकाऱ्यांना करून दिली असे खा.अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!