नांदेड(प्रतिनिधी)-कंधार पोलीसांनी मौजे जांब मार्गे कंधारकडे येणाऱ्या एका मालवाहु चार चाकी गाडीला पकडून त्यात अत्यंत दाटीवाटीने कोंबून कत्तलीसाठी जाणारे 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचे तीन गोवंश पकडले आहेत. तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑपरेशन फ्लॅश आऊट दरम्यान कंधार पोलीसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी जांब मार्गे कंधारकडे येणारा मालवाहतुक छोटा वाहन क्रमांक एम.एच.26 बी.ई.8548 दिग्रस गावाजवळ थांबवला आणि त्याची तपासणी केली असता त्यात 3 गोवंश जातीचे बैल अत्यंत दाटी वाटीने बांधलेले होते आणि ते कत्तलीसाठी जाणार आहेत अशी माहिती मिळाली. कंधार पोलीस रिजवान कदीर कुरेशी, रऊफ मस्तान कुरेशी, अंकुश रेशमाजी कांबळे या तिघांविरुध्द महाराष्ट्रप्राणी संरक्षण कायदा, मोटारवाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पकडले तीन गोवंश 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचे आणि 2 लाखांची मालवाहतुक गाडी असा 3 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल कंधार पोलीसांनी जप्त केला आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, कंधारच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी कंधारचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस उपनिरिक्षक गोपाळ इंद्राळे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक महागावकर, पोलीस अंमलदार राजेश श्रीरामे, प्रकाश टाकरस, जुने, धुतमल, रमेश जोगपेटे यांचे कौतुक केले आहे.