तीन दिवस ऐतिहासिक, दुर्मिळ व प्राचीन ठेव्यांचे दर्शन घडणार नांदेड (प्रतिनिधी)- येथील जुन्या नांदेड मधील ऐतिहासिक नंदगिरी किल्ला येथे उद्या, शुक्रवार, दि.३ एप्रिल ते दि.५ एप्रिल २०२६ या कालावधीत छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेल्या शिवकालीन सुवर्ण होन, दोन हजार वर्षांपासूनची प्राचीन नाणी व पुरातन शस्त्रे व आयुधे यांचे आगळे वेगळे अभिनव प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले नांदेडच्या नंदगिरी किल्लेदार व नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेल्या सुवर्ण होन (सुवर्ण नाणे) प्रदर्शनाचे उद्घाटन दि.३ एपिल रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहूल कर्डिले व प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, इंटेकचे चेअरमन अशोकसिंघ ठाकूर यांची उपस्थिती राहणार आहे. इसवी सन पूर्व ६०० पासूनची दुर्मिळ नाणी यांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन दि.४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून भोकरच्या आमदार कु.श्रीजया चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील ऐतिहासिक असलेल्या १२ किल्ल्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन दि.४ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर हे राहणार आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड मनपाच्या महापौर सौ. कविता मुळे,उपमहापौर दीपकसिंह राऊत यांची उपस्थिती राहणार आहे. या प्रदर्शनाचा समारोप समारंभ दि.५ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता होणार आहे.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रम्हे हे राहणार असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मनोहर चासकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे तसेच प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार व नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून अहोरात्र प्रयत्न करून सुरज गुरव व नंदगिरीच्या किल्लेदार यांनी नंदगिरीच्या किल्ल्यास एक रूप दिले. नामशेष झालेल्या किल्ल्यावर दर रविवारी मोहीमा राबवून किल्ल्यांची दखल घ्यायला भाग पाडले.त्यातूनच शासनाने 6 कोटी 29 लाख रूपये मंजूर केल्याने किल्ल्यावर सध्या दुरुस्तीचे काम प्रगती पथावर चालू आहे.नांदेडचा किल्ला आकार घेत असून भविष्यात तो नांदेड मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येईल हा विश्वास किल्लेदार यांना आहे. Kanthak Suryatal Post Views: 667 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड,हिंगोली,परभणी आणि लातूर जिल्ह्यात एलसीबी कार्यरत आहे काय ? नांदेड शहरामध्ये नाल्यांचा प्रश्न गंभीर; नागरिकांच्या आरोग्यावर संकट