नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी काही देशी व काही विदेशी दारुसह एक चार चाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन असा एकूण 3 लाख 50 हजार 955 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन फ्लॅशआऊट दरम्यान मागील तीन दिवसांमध्ये पोळा सणानिमित्त अवैध दारु विक्रेते आणि धाबा चालविणाऱ्या सात जणांविरुध्द कार्यवाही करण्यात आली. पोळा अनुशंगाने अवैध दारु विक्री करणारे महाराष्ट्र धाबा मालेगाव, महाकाली धाबा अर्धापूर यांच्यावर कार्यवाही करण्यात आली. अवैध दारु विक्रेत्यांकडून देशी व विदेशी दारु मिळून 30 हजार 55 रुपयांचा दारु पकडली. तसेच एक चार चाकी गाडी 3 लाख रुपयांची आणि एक दुचाकी गाडी 20 हजार रुपयांची असा एकूण 3 लाख 50 हजार 955 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर रोजी एकूण 4 गुन्हे दाखल करून सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक डॅनियल बेन आदींनी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस अंमलदार विजय आडे, नरवाडे, आनेबाईनवाड, डांगे, कदम आणि इंदु गवळी यांचे या यवाहीसाठी कौतक केले आहे.