इतवारा पोलिसांनी एका युवकाकडून दोन गावठी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे पकडली

नांदेड,(प्रतिनिधी)- शहरात एक 19 वर्षीय युवक दोन गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने 31 ऑगस्ट रोजी त्या युवकाला पकडले. त्याच्याकडून दोन अग्निशस्त्र अर्थात गावठी कट्टे आणि 2 जिवंत काढतुसे असा एकूण 50 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सध्या नांदेड शहरातच नव्हे तर नांदेड पोलीस परीक्षेत्रात अर्थात चार जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन फ्लॅश आऊट सुरू आहे. या अंतर्गत इतवारा गुन्हे शोध पथकाने काढलेल्या माहितीनुसार एक युवक बाफना टी पॉइंटजवळ 2 गावठी कट्टे घेऊन थांबलेला आहे. पोलीस पथकाने सापळा रचून योगेश मारुतीराव पवार (19) बरड शेवाळा ता. हदगाव जि. नांदेड याच ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला दोन अग्निशास्त्र अर्थात गावठी कट्टे सापडले. सोबतच 2 जिवंत काडतुसेही त्याच्याकडे होती. या सर्व साहित्याची किंमत 50 हजार 600 रुपये आहे. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात योगेश मारुतीराव पवार विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यातील कलम 7/25 तीन 3/25 नुसार गुन्हा क्रमांक 326/ 2024 दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप,पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उप अधीक्षक सुशील कुमार नायक यांनी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या युवकाला पकडलेल्या कार्यवाहीसाठी पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास बिसाडे, मोहन हाके, लक्ष्मण दासरवाड, धीरज कुमार कोमुलवार, हबीब चाऊस आणि संघरत्न गायकवाड यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!