नांदेड – आपल्या आजूबाजूला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके, सापडलेली बालके, सोडून दिलेली बालके, बालविवाह, संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत आवश्यक मदत कुठून कशी मिळवून देता येईल, याकरीता कुठे संपर्क करावा याबाबत सामान्य नागरीकांमध्ये संभ्रम असतो. यासाठी आता चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 कार्यान्वित करण्यात आली. संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी भारत सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणी व संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाइन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकांना मदत मिळवून देऊ शकतात. या संबधी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाते. याद्वारे संकटग्रस्त बालकांना मदत करण्यासाठी संबंधीतांनी 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी. रंगारी यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,073 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रब्बी हंगामातील पिकांसाठी 15 नोव्हेंबरपर्यत पाणी अर्ज करण्याचे आवाहन निवडणूक बैठकीला दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : निवडणूक अधिकारी