नांदेड(प्रतिनिधी)-खा.वसंतराव चव्हाण यांच्या अंत्यविधी यात्रेला गेल्या एका व्यक्तीची दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. मनोहर जळबाजी मोरे रा.किनाळा ता.बिलोली हे 27 ऑगस्ट रोजी खा.वसंत चव्हाण यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात नायगाव येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.पी.7151 ही नायगाव येथील संगमेश्र्वर फर्निचर या दुकानासमोर उभी केली होती. अंत्यविधी झाल्यावर परत आले तेंव्हा त्यांची दुचाकी चोरीला गेली होती. नायगाव पोलीसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्रमांक 217/2024 प्रमाणे दाखल केला आहे. पोलीस अंमलदार सांगवीकर अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,843 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 72 वर्षीय व्यक्तीला 80 हजारांना गंडविले देवदर्शनासाठी गेलेल्या कुटूंबाचे घरफोडून 3 लाख 50 हजारांचा ऐवज लंपास