नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षकांनी बदली झालेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना त्यांची बदली झालेल्या ठिकाणी त्वरीत जाण्यासाठी मुक्त करावे आणि त्याचा अहवाल 26 ऑगस्ट रोजी पर्यंत पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयास पाठवावा असे आदेश दिल्यानंतर सुध्दा चारही जिल्ह्यांमधील बरेच पोलीस अधिकारी अद्यापही त्याच ठिकाणी आहेत अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांना पाठविलेल्या पत्रानुसार पोलीस महासंचालक कार्यालयाने आणि पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाने पोलीस अधिकारी यांच्या विहित कालावधी पुर्ण झाल्यानंतर, पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांना इतरत्र नेमुणका/ बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कारणावरुन काही पोलीस अंमलदारांच्या बदल्या सुध्दा जिल्ह्या अंतर्गत झाल्या आहेत.या सर्व बदल्या झाल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना बदली झाल्यानंतर बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी सोडणे अनिवार्य असते. पण काही अधिकारी आणि काही पोलीस अंमलदारांबाबत त्यांच्या बदल्या झाल्यानंतर सुध्दा त्यांना बदलीवर सोडले जात नाही. अर्थातच बदली कायद्यामधील उद्देश त्यामुळे विफल होतो. सोबतच इतर पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना अ समानतेची वागणुक दिल्याबद्दल भावना निर्माण होते. तरी चारही जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी या पुर्वीच्या पोलीस महासंचालकांचे आदेश, पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाचे आदेश यानुसार बदली/ पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना त्यांची बदली झाली आहे. त्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करावे. तसेच त्याबाबतचा अहवाल 26 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 8 वाजेपर्यंत पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयास पाठवावा असे पत्रात लिहिले आहे. हे पत्र 23 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आले होते. आज 27 ऑगस्ट 2024 पर्यंत सुध्दा चारही जिल्ह्यांमध्ये काही पोलीस अधिकारी आणि काही पोलीस अंमलदार आहे त्याच ठिकाणी आहेत त्यांना बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.
जे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले नाहीत आणि त्यांचा अहवाल पाठविण्यात आला नाही त्यांचे काय? असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. बनी तो बनी नही तो… या गावातील लोखंडी पुरूषाने मागच्या महिन्यापासूनच माझ्या बदलीला एक वर्ष मुदतवाढ मिळाली असल्याची अफवा पसरविली आहे आणि ती मुदतवाढ पोलीस महासंचालक कार्यालयाने दिली आहे असे लोखंडी पुरूष सांगत आहेत. पोलीस महासंचालक कार्यालय एक आदेश काढेल किंवा अनेक काढेल पण ते सर्व बदल्यांचे आदेश, मुदतवाढीचे आदेश, बदलीला स्थगितीचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होतात. आज 27 ऑगस्ट रोजी पर्यंत सुध्दा लोखंडी पुरूषाच्या बदलीला मुदतवाढ मिळाल्याचा आदेश त्या संकेतस्थळावर दिसत नाही. यासाठी नक्कीच पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप हे काही तरी पर्याय काढतील अशी अपेक्षा आहे.