नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड शहरात मामा चौक, जुना कौठा येथील मैदानात 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट असे 7 दिवस पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या मुखारविंदाने शिवमहापुरान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवपुरान कथेला ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता लक्षात घेवून वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही यासाठी काही मार्ग बंद करण्यात आले आहेत आणि काही मार्ग पर्यायी मार्ग म्हणून तयार करण्यात आले आहेत अशी सुचना नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी प्रसिध्दीसाठी पाठविले आहेत. जनतेने या सात दिवसांमध्ये आपला प्रवास कौठा येथून होणार असेल तर त्या प्रवासाचे नियोजन करावे.
महाशिवपुरान कथा कार्यक्रमासाठी बाहेरुन येणाऱ्या वाहुकीसाठी बंद असेलेले मार्ग:- कथाकार्यक्रमासाठी परभणी-वसमत-पुर्णाकडून येणारी वाहतुक छत्रपती चौक-तरोडा नाका-राजकॉर्नर-वर्कशॉप ते वजिराबाद चौकाकडे येणारी वाहतुक बंद राहिल. कथा कार्यक्रमासाठी अर्धापूरकडून येणारी वाहतुक डॉ.शंकरराव चव्हाण चौक- नमस्कार चौक- महाराणा प्रतापसिंह पुतळा ते शहरात येणारी वाहतुक पुर्णपणे बंद राहिल. कथाकार्यक्रमासाठी लिंबगावकडून येणारी वाहतुक वाघी रोड-पोलीस मुख्यालय-तिरंगा चौक-गोवर्धनघाट पुलकडून जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद राहिल.
महाशिवपुरान कथा कार्यक्रमस्थळाकडे जाण्यासाठी वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग:- कथाकार्यक्रमासाठी परभणी-वसमत-पुर्णाकडून येणारी वाहतुक छत्रपती चौक-मोर चौक-पिवळी गिरणी-खडकपुरा अंडर ब्रिज-वाघी-रोड हस्सापुर ब्रिज ते कार्यक्रमाच्या पार्किंग ठिकाणी जाईल. कथा कार्यक्रमासाठी अर्धापूरकडून येणारी वाहतुक आसना पुल ओव्हर ब्रिज-धनेगाव चौक-दुधडेअरी-डॉ.आंबेडकर चौक-बसवेश्र्वर चौक-मामा चौक ते पार्किंग ठिकाणी जाईल. कथाकार्यक्रमासाठी लिंबगावकडून येणारी वाहतुक वाघी रोड-हस्सापूर ब्रिज ते कार्य्रकमाच्या पार्किंग स्थळाकडे जाईल. कथाकार्यक्रमासाठी नायगावकडून येणारी वाहतुक धनेगाव चौक-दुधडेअरी-आंबेडकर चौक-बसवेश्र्वर चौक-मामा चौक ते पार्किंग स्थळापर्यंत जाईल.
दि.23 ऑगस्ट ते 29 ऑगस्टपर्यंत सात दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेदरम्यान वाहतुकीचे नियोजन करतांना वरीलप्रमाणे सुचवलेल्या मार्गांनी महाशिवपुरान ऐकण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आणि शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या नागरीकांना या सुविधेचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे.