नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात झालेल्या पोलीस सत्तांतरानंतर अनेक नवीन नवीन प्रसंग पाहायला मिळत आहेत. त्यात काही पोलीस अंमलदार असे आहेत की, त्यांच्याशिवाय सहाय्यक पोलीस निरिक्षक दर्जाचा अधिकरी सुध्दा आपल्या कक्षाच्या बाहेर जाण्यास धजावत नाही. खरे तर हा प्रकार पोलीस अधिक्षकांच्या अगदी जवळ घडतो.
नांदेड जिल्हा पोलीस दलात सत्तांतर झाले. त्यात तीन मोठ्या जागांवर नवीन अधिकारी आले. सर्वात मोठ्या अधिकाऱ्याने नांदेड जिल्ह्यात आता काहीच चालणार नाही अशी तंबी नांदेड जिल्ह्यालाच नव्हे तर परभणी, हिंगोली आणि लातूर यांना पण दिली. त्यामुळे आज तरी सर्वत्र बेकायदेशीर कामे, दोन नंबरची कामे बंद असल्याची दिसतात. परंतू ती पुर्णपणे बंद नाहीत. ती बंद दाखविण्यात आलेली कामे आता कोठे सुरू आहेत हे शोधणे पोलीसांचे काम आहे.पण त्यांना ते पुर्ण करण्यासाठी वेळ लागेल हे सुध्दा तेवढेच खरे आहे.
आज बेकायदेशीर कामे आणि दोन नंबरचे धंदे बंद असल्याचे दिसत असले तरी ते कोठे सुरू आहेत. याची माहिती नक्कीच काही पोलीस अंमलदारांना असते, काही पत्रकारांना असते कारण पत्रकारांची नंबर 2 वाल्यांची दोस्ती पोलीसांनीच घडवून आणलेली असते. त्यामुळे आज बंद दिसणाऱ्या त्या बेकायदेशीर कामांकडून आणि 2 नंबरच्या धंदेवाल्यांकडून उगाही करण्याची एक खेळी सुरू आहे.
प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार पोलीस अधिक्षक कार्यालयात एक सहाय्यक पोलीस निरिक्षक भिंत बदलून बदली केलेला पोलीस अंमलदार कक्षात आला नाही तर त्यांची सुध्दा बाहेर जाण्याची हिम्मत नसते. तो पोलीस अंमलदारच सहाय्यक पोलीस निरिक्षकांचा खरा मार्गदर्शक आहे काय? पोलीस दलात सर्वात शेवटचे पद हे पोलीस अंमलदाराचे असते. भिंत बदललेल्या त्या पोलीस अंमलदाराने कमावलेली ही ख्याती पोलीस दलातील इतर पोलीस अंमलदारांना नक्कीच आदर्श ठरणारी आहे.