मॅक्स महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे पत्रकार धनंजय सोळंके यांना राज्यस्तरीय महाकवी डॉ. वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

नांदेड- येथील पत्रकार व मॅक्स महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे मराठवाडा ब्युरो धनंजय प्रल्हादराव सोळंके यांना छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्रमोद दुथडे फाऊंडेशनच्या वतीने 2024 चा राज्यस्तरीय महाकवी डॉ. वामनदादा कर्डक पुरस्कार देवून गौरव करण्यात आलाय. गेल्या पंधरा वर्षा पासून जिया न्युज,गर्जा महाराष्ट्र,महाराष्ट्र वन चॅनल,ABP माझा ते मॅक्स महाराष्ट्र सारख्या अग्रगण्य वृत्त वाहिण्यात पत्रकारिता करत मराठवाड्यातील शेतकरी, कष्टकरी,विद्यार्थी, दुर्लक्षित समाजाचे प्रश्न सरकार आणि समाजापुढे मांडून त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न प्रयत्न आपल्या वार्तांकनातून ते करतं आहेत. पत्रकरतेतील त्यांच्या योगदानाला लक्षात घेवून डॉ. प्रमोद दुथडे फाउंडेशनच्या वतीने त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. काल दिनांक 18ऑगस्ट रोजी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे तापडिया नाट्य मंदिर याठिकाणी घेण्यात आलेल्या भव्य सन्मान सोहळ्यात हजारोंच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रमोद दूथडे कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी रोख रकमेसह,शाल, श्रीफळ, गौरवचिन्ह देवून त्यांना महाकवी डॉ.वामनदादा कर्डक पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आलाय.या गौरव सोहळ्याला प्रमूख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक अनिल साबळे , व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड, शिक्षण महर्षी प्राचार्य सुनील वाकेकर रमेश पवार,डॉ, प्रमोद दुथडे, अभियांता अशोक येरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.सदर महाकवी डॉ.वामनदादा कर्डक राज्यस्तरीय समारोह रिपब्लिकन टायगर फोर्सचे अध्यक्ष विजयकुमार खंडागळे व डॉ. प्रमोद दुथडे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!