नांदेड(प्रतिनिधी)-एका युवतीच्या बॅगमधील 50 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी चोरल्याचा प्रकार शहरातील विश्रामगृह येथे घडला आहे. तसेच एका चार चाकी वाहनाच्या डिक्कीमधील 14 लाख रुपये काच फोडून चोरले आहेत.
दिशा हिंम्मतला शाह ही युवती 15 ऑगस्ट रोजी आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.26 सी.के.1139 वर बसून श्रीनगर ते सोमेश कॉलनी कलामंदिर असा प्रवास करत असतांना त्यांनी पाठीवर लावलेल्या बॅगमध्ये पाण्याच्या बॉटल ठेवण्याच्या कप्यात मोबाईल ठेवला होता. या प्रवासादरम्यान चोरट्यांनी युवतीची नजर चुकवून तो मोबाईल चोरून घेतला आहे. त्या मोबाईलची किंमत 50 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार मंगनाळे हे करीत आहेत.
हनमंत जेवंतराव हिंगोले हे गुत्तेदार आहेत. त्यांनी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास आपली चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.के.1167 मध्ये आपल्या कामासाठी 14 लाख रुपये ठेवले होते. चोरट्यांनी गाडीचे बाजूचे काच फोडून, डिक्कीचे लॉक तोडून ते 14 लाख रुपये चोरून नेले आहेत. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक फड अधिक तपास करीत आहेत.