नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस पथकाने दोन गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून चोरी केलेल्या चार दुचाकी गाड्या,सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 77 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतवारा येथील पोलीस निरिक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, परिविक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक विलास पवार, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक देविदास बिसाडे, पोलीस अंमलदार मोहन हाके, हबीब चाऊस, लक्ष्मण दासरवाड, धिरज कोमुलवार, रेवणदास कोळनुरे, नजरेआलम देशमुख, मोहम्मद जावेद, संघरत्न गायकवाड आदींनी 12 ऑगस्ट रोजी माळटेकडी ब्रिज परिसरात मोहम्मद एजाज उर्फ बॅनेट मोहम्मद अकबर (34), शेख अदनान सोहेल शेख कासीम(22) दोघे रा.गंगानगर, टायरबोर्ड इतवारा नांदेड यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चोरीच्या चार दुचाकी गाड्या आणि काही सोन्या-चांदीचे दागिणे सापडले. या दोन चोरट्यांना पकडल्यानंतर पोलीस ठाणे इतवारा येथील दोन , पोलीस ठाणे लिंबगाव आणि पोलीस ठाणे हिंगोली शहर येथील दोन अशा एकूण सहा चोऱ्या ल्या आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 1 लाख 77 हजार 600 रुपये आहे. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी इतवारा पोलीसांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 3,899 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सिख समुदायाचा ईतिहास सांगणारी चित्रप्रदर्शनी 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान अभ्यागतांसाठी मोफत प्रवेश जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे डिजिटल ऑडीट करण्यासाठीचा विषय 27 ऑगस्टच्या बैठकीत मांडला जाणार का?- प्रा.राजू सोनसळे