नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने उघडलेल्या ‘अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-५’ अंतर्गत जोरदार कारवाई सत्र सुरू आहे. पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या पहिल्या तीन आठवड्यांत म्हणजेच १ ते २१ नोव्हेंबर २०२६ दरम्यान पोलीस दलाने धडक कारवाया करत एकूण ९७५ गुन्हे नोंदवले असून तब्बल १,३८३ आरोपींवर कायदेशीर कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपींकडून १४ कोटी ८ लाख ४३ हजार ७५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध व्यवसायांविरोधात व्यापक कारवाई: ९७५ गुन्हे आणि १४.०८ कोटींचा मुद्देमाल जप्त पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चारही जिल्ह्यांमध्ये गुटखा विक्री, अवैध दारू, मटका-जुगार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि इतर विविध अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. तिसऱ्या आठवड्याअखेर विविध कायद्यांखाली करण्यात आलेल्या कारवायांचा मुख्य तपशील खालीलप्रमाणे आहे: महाराष्ट्र दारूबंदी कायदा: अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात सर्वाधिक ७०१ कारवाया करण्यात आल्या असून, या प्रकरणी ६७७ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमधून २७ लाख ३६ हजार २१५ रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मटका आणि जुगार कायदा: मटका व जुगाराच्या अड्ड्यांवर १३३ कारवाया करून ४८६ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत १ कोटी १० लाख ८१ हजार ४४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. इतर कायदेशीर कारवाया: इतर विविध अधिनियमांखाली ११९ गुन्हे दाखल करून १९२ आरोपींवर कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये सर्वाधिक १२ कोटी ३५ लाख ९४ हजार ८१५ रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध शस्त्र अधिनियम: बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात १६ कारवाया करून २० आरोपींना अटक करण्यात आली आणि ३ लाख ९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गेला. गुटखा बंदी (भारतीय न्याय संहिता कलम १२३): मानवी आरोग्यास घातक असलेल्या गुटख्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर ६ गुन्हे दाखल करून ८ आरोपींना गजाआड करण्यात आले. या कारवाईत ३१ लाख २१ हजार ४८९ रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्रातील जिल्हावार कारवायांचा सविस्तर तक्ता नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये झालेल्या कारवायांची आकडेवारी खालील तक्त्यात स्पष्ट करण्यात आली आहे: जिल्हा गुटखा कारवाया (गुन्हे / मुद्देमाल रु. / आरोपी) मटका/जुगार (गुन्हे / मुद्देमाल रु. / आरोपी) अवैध दारू (गुन्हे / मुद्देमाल रु. / आरोपी) शस्त्र अधिनियम (गुन्हे / मुद्देमाल रु. / आरोपी) इतर केसेस (गुन्हे / मुद्देमाल रु. / आरोपी) नांदेड १ गुन्हा / ₹२९,२३४ / १ आरोपी ५१ गुन्हे / ₹५५,७९,०४० / २६८ आरोपी १६९ गुन्हे / ₹५,७०,७३५ / १४८ आरोपी ९ गुन्हे / ₹१,६२,२०० / १३ आरोपी ४८ गुन्हे / ₹८,९०,५३,६९६ / ९८ आरोपी परभणी २ गुन्हे / ₹११,२२,९४१ / ३ आरोपी ३० गुन्हे / ₹२,६५,७१० / ९० आरोपी १६९ गुन्हे / ₹७,८६,१५० / १६४ आरोपी २ गुन्हे / ₹६,००० / २ आरोपी १८ गुन्हे / ₹१,७२,५२,४६५ / ३० आरोपी हिंगोली १ गुन्हा / ₹९,४३४ / १ आरोपी २२ गुन्हे / ₹२,०७,८६० / ४४ आरोपी १५९ गुन्हे / ₹२,९६,७१० / १६० आरोपी ३ गुन्हे / ₹१,०१,६०० / ३ आरोपी २५ गुन्हे / ₹१,०४,५२,६९० / २८ आरोपी लातूर २ गुन्हे / ₹१९,५९,८८० / ३ आरोपी ३० गुन्हे / ₹५०,२८,८३० / ८४ आरोपी २०४ गुन्हे / ₹१०,८२,६२० / २०५ आरोपी २ गुन्हे / ₹४०,००० / २ आरोपी २८ गुन्हे / ₹६८,३५,९६४ / ३६ आरोपी एकूण ६ गुन्हे / ₹३१,२१,४८९ / ८ आरोपी १३३ गुन्हे / ₹१,१०,८१,४४० / ४८६ आरोपी ७०१ गुन्हे / ₹२७,३६,२१५ / ६७७ आरोपी १६ गुन्हे / ₹३,०९,८०० / २० आरोपी ११९ गुन्हे / ₹१२,३५,९४,८१५ / १९२ आरोपी विशेष पथकाची धडक कारवाई आणि खबर हेल्पलाइनद्वारे नागरिकांना आवाहन स्थानिक पोलीस ठाण्यांच्या कारवायांसोबतच पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने प्रत्यक्ष मैदानात उतरून अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये विशेष पथकाने: लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड टाकली, लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मटका अड्ड्यावर कारवाई केली, आणि परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीत मटक्याविरुद्ध धाड टाकून कारवाई केली. या सर्व कारवायांचा समावेश अंतिम आकडेवारीमध्ये करण्यात आला आहे. नागरिकांसाठी ‘खबर’ हेल्पलाइनचे आवाहन नागरिक आपल्या भागातील जुगार, मटका, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री किंवा इतर अवैध धंद्यांची माहिती थेट पोलिसांपर्यंत सहज व गोपनीयरीत्या पोहोचवू शकतील, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने खबरना वाची विशेष हेल्पलाइन सुरू केली आहे. यासाठी ९१ ५० १०० १०० (91 50 100 100) हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी निर्भयपणे या क्रमांकावर अवैध व्यवसायांची माहिती देऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 10 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अधिकाऱ्यांना गोदावरीत बुडवा – आमदारांचा अजब दुष्काळ निवारण फॉर्म्युला!