गुरूद्वारा बोर्ड प्रकरणातील फसवणूक प्रकरणी प्रभारी अधिक्षकाला न्यायालयाने अटकपुर्व जामीन नाकारला

नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड दरबार साहिबमध्ये अखंड पाठ साहिबच्या रक्कमेत 36 लाखांचा घोळ करणाऱ्या ठानसिंघ बुंगई यांनी मागितला अटकपुर्व जामीन पहिले सदर्थ अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती इंदापूरकर यांनी फेटाळला आहे.

देशातील आणि विदेशातील अनेक भाविकांनी सचखंड दरबार साहिबमध्ये अखंड पाठ साहिब या माध्यमातून आशिर्वाद मागतात. अखंड पाठ साहिब ही सचखंड दरबार साहिबमध्ये कायम सुरू असणारी एक प्रार्थनाच/सेवा आहे. त्यासाठी गुरुद्वारा बोर्डाच्या कार्यालयात फिस जमा करावी लागते. त्यानंतर पाठीसिंघ त्या भाविकांच्या नावाने अखंड पाठ साहिबचे पठण करतात. 2016 ते 2019 दरम्यान या अखंड पाठ साहिबच्या हिशोबामध्ये भरपूर गोंधळ झाला. या तिन वर्षाच्या कालखंडामध्ये भाविकाला दिलेली अखंड पाठ साहिबजीच्या फिसची पावती आणि प्रत्यक्षात जमा झालेली रक्कम यामध्ये मोठे अंतर आले. हा आकडा एकूण 36 लाख 69 हजार 350 रुपयांचा झाला. या संदर्भाने नांदेड येथील जगदीपसिंघ मोहनसिंघ नंबरदार या युवकाने या घोळ बाबत विविध सक्षम अधिकाऱ्यांचे, सक्षम संस्थांचे उंबरठे झिजवले आणि त्यानंतर कुे री गदीपसिंघ नंबरदारच्या मेहनतीला यश आले आणि जुलै 2024 या महिन्यात वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 आणि 34 नुसार तत्कालीन गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक ठाणसिंघ जिवनसिंघ बुंगई जे आता सध्याही प्रभारी अधिक्षक या पदावर कार्यरत आहेत. तसेच रविंद्रसिंघ हुजूरासिंघ सुखई, तत्कालीन लिपीक महिपालसिंघ कृपालसिंघ लिखारी, धरमसिंघ मोहनसिंघ झिलदार या पाच जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 303/2024 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम,पोलीस अंमलदार शंकर बिरमवार यांच्याकडे देण्यात आला. आपल्याला अटक होईल या भितीतून सध्याचे प्रभारी अधिक्षक ठाणसिंघ बुंगई यांनी नांदेड जिल्हा न्यायालयात फौजदारी अर्ज क्रमांक 562/2024 दाखल करून अटकपुर्व जामीन मागितला. या संदर्भाने झालेल्या सुनावण्यांमध्ये न्यायालयात ठाणसिंघ बुंगई यांनी पण आज काही कागदपत्र दाखल केले. याबाबत निर्णय देतांना न्यायाधीश इंदापुरकर यांनी ठाणसिंघ जीवनसिंघ बुंगई यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ऍड.रणजित देशमुख यांनी बाजू मांडली.

संबंधित बातमी….

सचखंड श्री हजुर साहिब येथे सन 2016 ते 2019 दरम्यान झालेल्या 36 लाख 70 हजाराच्या घोटाळ्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!