नांदेड(प्रतिनिधी)-भारतरत्न नानाजी देशमुख यांचे भाचे, शहरातील वजिराबाद हनुमान पेठ भागातील प्रतिष्ठित नागरिक व जुन्नी येथील प्रगतीशील शेतकरी अविनाशराव किशनराव देशमुख जुन्नीकर यांचे अल्पशा आजाराने दि. ६ ऑेगस्टच्या मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, भूषण उर्फ राजू, उमेश उर्फ हेमू, धनंजय ही ३ मुले, सुना,मुलगी सौ.मंजुषा, जावई डॉ.एकनाथ कुलकर्णी, नाती, नातू, नात जावई, पतवंडे, भाऊ, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता गोवर्धनघाटच्या शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे वाळकीकर,कुंटुरकर,प्रवीण शर्मा यांनी श्रध्दांजली वाहिली. उपस्थितांनीही दोन मिनिटे स्तब्ध राहून अविनाश देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण केली.
More Related Articles
7 ऑगस्ट रोजी राज ठाकरे नांदेडमध्ये
नांदेड -आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बँकांनी कोणतेही पैसे कपात करू नये
महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम थेट जमा करावी नांदेड:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अंतिम पात्र…
होमगार्ड नोंदणीबाबत उमेदवारांना सूचना
नांदेड – नांदेड जिल्हयातील होमगार्ड अनुशेष पुर्ण करण्यासाठी होमगार्ड नोंदणी 30 ऑगस्ट 2024 पासुन पोलीस…